April 18, 2021

Maharashtra Metro

online news portal

स्थानिक गुन्हे शाखा आणि उपविभागीय पोलीस अधिकारी गडचांदुर पथकाची अवैध दारू तस्करी विरुद्ध धकाडेबाज कार्यवाही ०२ गुन्हयात ५५ लक्षचा मुद्देमाल

हस्तगत दिनांक २५/०६/२०२० रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पोलीस स्टेशन रामनगर परिसरात पेट्रोलींग करीत असतांना गोपनीय माहिती मिळली की, एक इसम मुल कडुन चंद्रपुर कडे एका चारचाकी टाटा मालवाहुन वाहनाने अवैध रित्या दारूची वाहतुक करीत आहे. अशा माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ संजय नगर चंद्रपुर रोडवर नाकेबंदी लावली असता काही वेळातच मिळालेल्या माहितीच्या वर्णनाचा एक टाटा मालवाहु ट्रक येतांना दिसला. सदर वाहन थांबवुन विचारपुस करून वाहनाची झडती घेतली असता, वाहनातील मागच्या भागात एक विषेश कप्पा ज्यामध्ये १०० बॉक्स देशी दारू कि, १०,००,०००/-रू चा माल मिळुन आला. सदर दारूचा माल आणि वाहतुकीकरीता वापरलेले टाटा कंपनीची मालवाहु वाहन क एमएच ११ एल ०५१५ कि.१०,००,०००/-रू असा एकुण २०,००,०००/-रू चा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे. सदरचा गुन्हा पोलीस स्टेशन रामनगर येथे नोंद करण्यात आला असुन आरोपी नामे सुरज प्रकाश वावडे वय २९ रा, जुनोना चौक बाबुपेठ चंद्रपुर यास अटक करण्यात आली आहे. पुढिल तपास रामनगर पोलीस करीत आहे.

दुसरीकडे उपविभीय पोलीस अधिकारी कार्यालय गडचांदुर आणि पोलीस स्टेशन गडचांदुर येथील पोलीस पथकाने मिळालेल्या गोपनीय माहितीवरून एका ट्रकचा पाठलाग करून नारडा फाटा येथे ताब्यात घेवुन ट्रकची झडती घेतली असता ट्रकच्या मागच्या कप्यात अवैध रित्या देशी दारू १०० बॉक्स किं.

५,००,०००/-रू माल मिळुन आला. सदर दारूचा माल आणि वाहन क.एमएचबी ई२२८९कि .३०,००,०००/-रूअसा२९ एकुण ३५,००,०००/-रू चा मुदमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदरचा गुन्हा पोलीस स्टेशन गडचांदुर येथे नोंद करण्यात आला असुन आरोपी नामे प्रकाश शालीकराव उईके उर्फ लोखंडे यास अटक करण्यात आली आहे. पुढिल तपास

सुरू आहे. सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक चंद्रपुर डॉ.  महेश्वर रेड्डी यांचे मार्गदर्शनात गडचांदुर येथील कार्यवाही उपविभागीय पोलीस अधिकारी

Advertisements

विलास यामावार यांचे नेतृत्वात पोनि. गुरूनुले, पोहवा. वसंत सिडाम, पोशि.

प्रकाश निमकर, राम हाके, स्वप्निल बोंडे, यांनी केली तर स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही पोलीस निरिक्षक स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर  ओ.जी. कोकाटे यांचे नेतृत्वात सपोनि. जितेंद्र बोबडे, पोहवा. राजेंद्र खनके, पिया जमीर पठाण, मिलींद चव्हाण, अनुप डांगे, प्रफुल मेश्राम, वामन ढाकणे यांनी पार पाडली.

 

Advertisements
error: Content is protected !!