April 15, 2021

Maharashtra Metro

online news portal

बनावट कागदपत्र तयार करून नोकरीचे आमिष दाखवुन फसवणुक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही

दिनांक १७/०६/२०२० रोजी फिर्यादी नामे सिध्दार्थ गणपतराव थोरात क्षेत्रीय कार्मीक प्रबंधक डब्लुसिएल, चंद्रपुर यांनी पोलीस स्टेशन रामनगर येथे रिपोर्ट दिली की, १० इसमांनी डब्लुसिएल मध्ये नोकरी करीता बनावट कागदपत्र तयार करून नागपुर येथील क्षेत्रीय महाप्रबंधक कार्यालयात सादर केले. यावरून पोलीस स्टेशन रामनगर येथे अप.क. ५३३/२०२० कलम ४२०,४६८,४६९,४७१.३४ भादवि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला

सदरचा गुन्हा हा क्लिष्ट स्वरूपाचा असल्याने गुन्हयाचा तपास मा
पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेडडी यांनी स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर यांचे कडे सोपविला. गुन्हा तपासादरम्यान फिर्यादी कडून मिळालेल्या माहितीनुसार ज्या व्यक्तींनी नोकरी मिळणेकरीता बनावट कागदपत्रे जमा केली होती त्यापैकी २ इसम आरोपी नामे निखिल दिलीप लोढे, २प्रविण बाबुराव सोनटक्के दोन्ही रा. चंद्रपुर यांना अटक करण्यात आली आहे. सदर इमासांची कसुन चौकशी केली असता, त्यांनी नौकरी मिळणेकरीता काही इसमांना पैसे दिले होते व त्याच इसामांनी बनावट कागदपत्र तयार केल्याचे सांगीतले त्यावरून त्या दोन इसमांकडुन पैसे घेवुन बनावट कागदपत्रे तयार करणारे राजु बरडे, संपत सायय्या दासारप, श्रीनिवास साहु तिन्ही रा. चंद्रपुर यांना अटक करण्यात आली आहे. सदर तिन्ही इसमांची गुन्हयाबाबत कसुन चौकशी केली असता त्यांनी सांगीतले की, नागपुर येथील एक इसम हा त्यांना नोकरी लावण्याकरीता आवश्यक ते कागदपत्रे बनावट तयार करून देत होता. याबाबत पुढिल तपास सुरू आहे.

सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक डॉ.  महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरिक्षक ओ. जी . कोकाटे यांचे नेतृत्वात पोउनि, गदादे, सफी. भोयर, पोना. बल्कि पोशि, बघमारे, मिलींद यांनी पार पाडली.

आवाहन तरी सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, कोणत्याही व्यक्तीने आपल्या कडे डब्लुसिएल वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड या किंवा इतर कंपनीमध्ये नोकरी लावुन देण्याचे आमिष दाखवुन आपल्या कडुन पैशांची मागणी करीत असल्यास स्थानिक गुन्हे शाखा येथे संपर्क साधावा.

Advertisements
error: Content is protected !!