
रेल्वे विभागात लोको पायलट चे पदावर रेल्वे स्टेशन घुगुस येथे नोकरीस असलेले अरुणराजु मलय्या जुमडे वय ५२ वर्षे हे हनुमान मंदिर जवळ सिस्टर कॉलनी नगिनाबाग वार्ड चद्रपुर येथे वास्तव्यास असल्याने चंद्रपुर ते घुगुस असे डयुटीवर ये-जा करतात. घटना ता. २२.०६.२०२० चे रात्रौ १ १५ ते ०१.२५ वा दरम्यान फिर्यादी अरुणराजु जुमडे हे त्याचे मोटार सायकलने रेल्वे स्टेशन घुगुस येथे इयुटीवर हजर होण्यास जात असताना हिरो रप्लेडर प्रो मोटारसायकलवरील २५ ते ३० वर्षे वयोगटातील अनोळखी ०३ इसमानी फिर्यादीचे मोटार सायकलला ओव्हरटेक करुन फिर्यादीस जबरी चोरी करण्याचे देशाने थांबविण्याचा प्रयत्न केला.
फिर्यादी न थांबल्याने आरोपीतांनी हातातील डंडा फिरवून फिर्यादीस मारहाण करुन थांबवण्याचे प्रयत्नात फिर्यादीचे डोक्यावरील हेलमेटला डंडा लागला तेव्हा फिर्यादी तेथून मोटार सायकलने सरळ पडोली मार्गे धुगुसला निघून गेला व रेल्वे स्टेशन घुगुस येथे ड्युटीवर हजर झाला व सकाळी डयुटी संपल्यानंतर पो.स्टे. पडोली येथे येवून तक्रार दिल्याने अनोळखी
आरोपीविरुध्द जबरी चोरीचे प्रयत्नाचा गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे
सदर गुन्हयाचे फिर्यादी कडून प्राप्त आरोपीचे वर्णन व तपासात मिळालेल्या गोपनिय माहितीचे आधारे श्री.सचिन यादव, पोलीस उप निरीक्षक यांनी स्वतः पोलीस पथकासह तपास चके फिरवून अवघ्या काही तासातच गुन्हयातील तीन आरोपीपैकी (१) मोहम्मद राहील मोहम्मद मकसुद वय २७ वर्षे रा नेहा नगर दुर्गापुर आणि (२) राहुल अरुण बोंदरे वय ३१ वर्षे रा.चंदूबाबा शेडे याने घरी किरायाने, दुर्गापुर यांना अटक करण्यात यश मिळविले आहे. अटक आरोपींनी तपासात दिलेल्या माहिती नुसार त्यांनी पो.
स्टे रामनगर हद्दीत सुध्दा एका इसमास मारहाण करुन त्याचेजवळील रोख रक्कम जबरीने हिसकावून नेल्याची कबुली दिलेली असून या संदर्भात पो.स्टे रामनगर येथे गुन्हा नोंद आहे. सदर आरोपींचा तिसरा साथीदाराचा शोध घेणे सुरु आहे.
सदरची कार्यवाही डॉ. महेश्वर रेड्डी, पोलीस अधिक्षक, प्रशात खैरे, अपर पोलीस अधिक्षक आणि शिलवंत नांदेडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रपुर यांचे मार्गदर्शनाखाली तसेच पडोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक एम एम कासार यांचे नेतृत्वात उपनिरीक्षक, पोलीस सचिन यादव पोलीस कर्मचारी सुरेंद्र खनके, स्वप्नील बुरीले, शिषण टोन, सुनिल वाकडे यानी यशस्वीरित्या पार पाडली आहे,
More Stories
जिल्ह्यात डॉ. भास्कर सोनारकर यांना सर्वप्रथम कोविशिल्ड लसीचा डोज
वाहनांचा अपघात करणार्या चालकांना अभयदान – न्यायाधिककाऱ्यांचा अजब निवाडा
अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूकीवर प्रशासनाची धडक कारवाई