April 22, 2021

Maharashtra Metro

online news portal

ओव्हरलोड वाहुक करणाऱ्या व अवैध रेती वाहतुक करणाऱ्या वाहनांवर वाहतुक शाखेची मोठी कार्यवाही

वाहतुक नियंत्रण शाखा, चंद्रपूर येथील पोलीस निरीक्षक हृदयनारायण यादव यांनी वाहतुक शाखेचे रामदास गेडाम, अरुन जुनघरे, संजय धोटे, विकास व चालक नंदकिशोर यांच्यासह मा.

पोलीस अधीक्षक डॉ. श्री महेश्वर रेड्डी व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री प्रशांत खैरे यांच्या मार्गदर्शनात दि. १९/०६/२० रोजी दुपारी ०२:०० वा. च्या सुमारास नागपूर रोड ने मुरुम भरुन जात असलेले हायवा ट्रक क्रमांक JH 0357549 व JH 0350695 ही वाहने चेक केली असता त्यात १५ टन (१५०००कि.ग्रॅ.) क्षमतेपेक्षा अतिरिक्त माल वाहुन नेतांना आढळुन आली. सदरचा वाहने झारखंड राज्यातील अग्रवाल ग्लोबल इंफाटेक प्रा. लि. यांच्या मालकीची असुन त्यांनी महाराष्ट्राचे परमीट न काढल्याचे दिसुन आले. सदर दोन्ही वाहनांवर कार्यवाही होण्याकरीता उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे प्रकरण वर्ग करण्यात आले आहे.

दि.१९/०६/२० रोजी रात्री गस्ती दरम्यान पोलीस ठाणे रामनगर च्या हद्दीत हायवा कमांक हायवा ट्रक क्रमांक MH 34 M 3664 व JCB कमांक MH 34 AP 3433 ही वाहने संशयास्पद दिसुन आल्याने त्यांना चेक केले असता सदर वाहनात अवैध रेती चोरुन घेवुन जात असल्याचे निदर्शनास आले. सदरची बाब महसुल विभागाच्या निदर्शनास आनुन दिली. या दोन्ही वाहनाचे चालक आदील खान अहमद खान व तुळशिराम भाऊजी देवतळे यांचेवर अपराध कमांक ५४३/२० कलम ३७९, १८८, ३४ भारतीय दंड संहीता अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

Advertisements
error: Content is protected !!