
गोंडपीपरी तालुक्यातील भंगाराम तळोधी येथील गावालगत असलेल्या विहिरीत काल एका 19 वर्षीय नवविवाहितेचा मृतदेह आढळून आला. 19 मार्चला रुचिता चित्तावार हिचा विवाह किशोर खाटीक याच्याशी झाला होता. ती आपल्या पतीसह चंद्रपूरला वास्तव्यास होती मात्र चार दिवसापुर्वी रूचीता भंगाराम तळोधी येथे आली होती. ती तीन महिन्यांनी गर्भवती होती. काल सायंकाळच्या सुमारास शौचास बाहेर पडली. पण बराच वेळपर्यत घरी परतली नाही. यामूळ नातेवाईकांनी शोधाशोध सूरू केली.
दरम्यान गावालगत असलेल्या विहीरीजवळ लोटा व चप्पल आढळून आली. गोंडपिपरी पोलीसांना घटनेची माहिती देण्यात आली. यावेळी शोधाशोध केली असता विहिरीमध्ये रूचीताचा मृतदेह आढळून आला. मृत्यूचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही मात्र याचा मोठा आघात पती किशोर खाटीक याच्यावर झाला. आज दुपारी रुचितावर अंत्यसंस्कार होत होते.
सर्वत्र शोकाकुल वातावरण होते. पती मंगेश ह्याने तिला चिताग्नी दिली, मात्र त्याच्या मनात दुसरेच काही सुरू होते ज्याची कल्पना कुणालाच नव्हती. पत्नीचे पार्थिव पेट घेतल्यानंतर त्याने थेट चितेतच उडी घेतली. यात मोठया प्रमाणात मंगेश जळाला. गावातल्या नागरिकांनी त्याला बाहेर काढलं. पण पत्नीच्या विरहात त्याला एक क्षणही राहायचं नव्हतं. अखेर त्याने धाव घेत थेट विहिरीत उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपविली.
More Stories
ढोरवासा केंद्रप्रमुखाकडून सावित्रीच्या लेकींचा सत्कार भद्रावती,दि.१९
अवैध रेती वाहतुक करणाऱ्या वाहनांवर स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही
मोबाईल बघताना युवकाचा मृत्यू