
पोलिस अधीक्षक रेड्डी यांनी जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाणेदार यांना दारू तस्करा वर कारवाई करण्याचे आदेश दिले त्यामुळे जिल्ह्यात अवैध दारू माफियांची सगळीकडे धरपकड सुरू असून त्यामुळे जिल्ह्यात सर्वत्र दारू तस्कर भयभीत झाले असल्याचे चित्र आहे. अशातच घूग्गूस पोलिसांनी मयुर सत्तार शेख वय 24 वर्षे धंदा मजुरी रा. वार्ड क्र.17 मुल ता.मुल जिल्हा चंद्रपूर
व दिनेश रविन्द्र आगबतनवार वय 24 वर्षे धंदा मजुरी रा. वार्ड क्र.17 मुल ता.मुल जिल्हा चंद्रपूर
या दोन दारू तस्करान धानोरा फाटा जवळ टोल नाक्यावर दुपारी अडीच वाजता
1500 नग प्लॉस्टीक शिश्या प्रत्येकी 90 मि.ली. ने भरलेल्या ज्याचे झाकणावर प्रवरा डिस्टीलरी रॉकेट प्रवरानगर लिहून छापीव लेबल रॉकेट देशी दारु संत्रा बॅच नं. 025JUN 2020 असलेल्या मिळून आल्या.सोबतच
500000 रू किमतीची पांढऱ्या या रंगाची स्विप्ट डिझायर गाडी क्र. MH34BF2289
10000रु.चा रेड मी कंपनीचा मोबाईल 6000-रु.चा ओपो कंपनीचा मोबाईल असा एकूण 6,66,000रू.चा माल जप्त करण्यात आला.
ही कारवाई मा.पो.नि.गांगुर्डे व स.पो.नि.चहांदे सो. यांचे मार्गदर्शनात गुन्हे शोध पथकाचे . गौरीशंकर आमटे , सचिन बोरकर, विनोद, महेश सुधिर सचिन आलिवार शार्दुलॅ निलेश यांनी कारवाई पार पाडली. चहांदे पुढेलिल तपास करीत आहे.
More Stories
सरपंच पदाचे आरक्षण 29 व 30 जानेवारीला
राज्यातल्या हुतात्मा स्मारकांच्या दुरुस्ती व नूतनीकरणाच्या प्रक्रियेत योगदान देवु शकल्याचा मनापासुन आनंद – आ. सुधीर मुनगंटीवार
घुग्गुस वासियांच्या मनातील प्रेमाचे स्थान आमच्यासाठी महत्वाचे – आ. सुधीर मुनगंटीवार