April 22, 2021

Maharashtra Metro

online news portal

चंद्रपूर जिल्हातील ४३ बाधित कोरोना आजारातून झाले बरे

चंद्रपूर महानगरातील स्नेह नगर परिसरातील २८ वर्षीय युवक कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील आतापर्यंतच्या बाधित नागरिकांची संख्या ५७ झाली आहे. हा युवक १३ जून रोजी मुंबईवरून परत आला होता. त्याला गृह अलगीकरणात ठेवण्यात आले होते. आरोग्य सेतू अॅपवरील नोंदीमुळे त्याची माहिती मिळाली. २१ जून रोजी या युवकाचे स्वॅब घेण्यात आले होते. २२ जून रोजी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्याची प्रकृती स्थिर असून आतापर्यंत जिल्ह्यातील ४२ बाधित बरे झाले आहेत. सध्या जिल्ह्यामध्ये केवळ १५ अॅक्टिव्ह बाधित आहेत.

चंद्रपूरमध्ये आतापर्यत २ मे ( एक बाधित ), १३ मे ( एक बाधित) २० मे ( एकूण १० बाधित ) २३ मे ( एकूण ७ बाधित ) व २४ मे ( एकूण बाधित २ ) २५ मे ( एक बाधित ) ३१ मे ( एक बाधित ) २जून ( एक बाधित ) ४ जून ( दोन बाधित ) ५ जून ( एक बाधित ) ६जून ( एक बाधित ) ७ जून ( एकूण ११ बाधित ) ९ जून ( एकूण ३ बाधित ) १०जून ( एक बाधित ) १३ जून ( एक बाधित ) १४ जून ( एकूण ३ बाधित ) १५ जून ( एक बाधित ) १६ जून ( एकूण ५ बाधित ) १७जून ( एक बाधित ) १८ जून ( एक बाधित ) २१जून ( एक बाधित ) आणि २२ जून ( एक बाधित ) अशा प्रकारे जिल्हयातील कोरोना बाधित ५७ झाले आहेत.आतापर्यत ४३ बाधित बरे झाल्याने सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे ५७ पैकी अॅक्टीव्ह बाधितांची संख्या आता १४ झाली आहे.

Advertisements
error: Content is protected !!