April 22, 2021

Maharashtra Metro

online news portal

आता नॉन एसी सभागृहांमध्‍ये लग्‍न समारंभांसाठी परवानगी मिळणार

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या प्रयत्‍नांना यश.

लॉकडाऊन दरम्‍यान लॉन तसेच नॉन एसी सभागृहांमध्‍ये लग्‍न समारंभासाठी परवानगी द्यावी अशी मागणी माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी शासनाकडे केली होती. त्‍या मागणीला यश प्राप्‍त झाले असुन लॉनमध्‍ये 50 लोकांच्‍या मर्यादेत सोशल डिस्‍टंसिंग पाळत लग्‍न समारंभासाठी परवानगी देण्‍यात आली आहे. आता नॉन एसी सभागृहांमध्‍ये 50 लोकांच्‍या मर्यादेत सोशल डिस्‍टंसिंग पाळत लग्‍न समारंभांसाठी परवानगी देण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला आहे. येत्‍या दोन दिवसात या संबंधीचा आदेश राज्‍य शासनातर्फे निर्ग‍मित होणार आहे. आ. सुधीर मुनगंटीवार यांनी या संबंधी केलेल्‍या पाठपुराव्‍याला व प्रयत्‍नांना यश प्राप्‍त झाले आहे.

Advertisements
error: Content is protected !!