April 15, 2021

Maharashtra Metro

online news portal

चिचपल्ली येथे 25 लाखांची रेती जप्त : ठाणेदार प्रकाश हाके यांची मोठी कारवाई रेती माफियांचे धाबे दणाणले

रामनगर पोलीसांची अवैध रेती तस्करी विरुद्ध कार्यवाही २५ लक्ष ७७ हजारच्या मुददेमालासह २ आरोपी अटक दिनांक

२०/०६/२०२० रोजी रामनगर पोलीसांना गोपनीय माहिती मिळाली की, मौजा अजयपुर जवळ अंधरी नदी शेजारील शेतात एक इसम जेसीबी मशीनच्या साहायाने रेती उचलुन हायवा ट्रक द्वारा चोरून नेत आहे. अशा माहितीवरून रामनगर पोलीसांनी तलाठी कर्मचारी यांचेसह अंधारी नदी जवळ जावुन पाहणी केली असता, एक इसम जेसीबी मशीनच्या साहायाने हायवा ट्रक मध्ये रेती लोड करीत होता. यावरून जेसीबी चालक आरोपी नामे तुळशिराम भाउजी देवतळे आणि हायवा ट्रक चालक आरोपी नामे आदिल खान अहमद खान रा, बाबुपेठ यांना अटक करण्यात आली.

सदरचा गुन्हा पोलीस स्टेशन रामनगर येथे अप.क, ५४३/२०२० कलम ३७९,१८८,३४ भादवि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदरच्या गुन्हयात एक जेसीबी मशीन क. एमएच ३४ एपी ३४३३ किं. १५,००,०००/-रू, एक हायवा ट्रक क, एमएच३४ एम ३६६४ किं.१०,००,०००/-रू, ३१ बॉस रेती किं.

७७.५००/-रू असा एकुण २५,७७,५००/-रू चा मुददेमाल हस्तगत करण्यात आला असुन पुढिल तपास रामनगर पोलीस करीत आहे.

Advertisements

सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक चंद्रपुर श्री. डॉ. महेश्वर रेड्डी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रपुर श्री. शिलवंत नांदेडकर यांचे मार्गदर्शनात पोनि. रामनगर श्री. प्रकाश हाके यांचे नेतृत्वात रामनगर पोलीस स्टेशन येथील अधिकारी पी एसआ पंचबुद्धे आणि अंकुश मांडले
भास्कर वाघ  कर्मचारी यांनी केली.

Advertisements
error: Content is protected !!