April 22, 2021

Maharashtra Metro

online news portal

स्थानिक गुन्हे शाखेची अवैध दारूतस्करांविरूध्द कार्यवाही ३ चारचाकी वाहनास २६ लक्ष ८१ हजाराचा मुददेमाल हस्तगत

दिनांक २०/०६/२०२० रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास गोपनीय माहिती मिळाली की, तळोधी येथील सोनु कटारे हा अविनाश नवरखेडे रा. हिंगणघाट याचे स्कॉर्पिओ वाहनाने सिंदेवाही येथील विरवा गावाजवळील बंद गोदामाजवळ देशी दारूचा माल आणुन मुल येथील नरसिंग अण्णा यास विकी करणार आहे.

अशा माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रात्री दरम्यान विरवा गावाजवळील पेट्रोलपंपाजवळ सापळा रचला असता, तीन वाहन ज्यामध्ये एक स्कॉर्पिओ, आणि दोन रिट्ज येतांना दिसले,

सदर तिन्ही वाहने गोदामाजवळ थांबन वाहनातील इसम हे स्कॉर्पिओ वाहनातुन दारू काढुन रिट्ज वाहनात टाकत असतांना स्थागुशा पथकाने छापा टाकला असता, एक इसम जागेवरच मिळुन आला.

सदर इसमास ताब्यात घेवुन विचारपुस करून वाहनाची झडती घेतली असता, ९८ बॉक्स देशी दारू किं. ९,८०,०००/-रू, लाल रंगाची रिट्ज गाड़ी क. एमएच ३३ ए १५७० कि. ५,००,०००/-रू, पांढऱ्या रंगाची रिट्ज गाडी क. एमएच३१ सिए ३४६८ कि.

Advertisements

५,००,०००/-रू आणि एक स्कॉर्पिओ वाहन क. एमएच३१ ईके ०१९५ किं. ७,००,०००/-रू, आणि एक सॅमसंग कपनीचा मोबाईल फोन किं. १,०००/-रू असा एकुण २६,८१,०००/-रू चा मुददेमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदरचा गुन्हा पोलीस स्टेशन सिंदेवाही येथे नोंद करण्यात आला असुन पुढिल तपास आणि आरोपीचा शोध सिंदेवाही पोलीस करीत आहे.

सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक चंद्रपुर श्री. डॉ. महेश्वर रेड्डी यांचे मार्गदर्शनात पोनि. स्थानिक गुन्हे शाखा. श्री ओ.जी.

कोकाटे यांचे नेतृत्वात, पोहवा. धनराज खरकाटे, पोशि. अमोल धंदे, गोपाल आतकुलवार, यांनी पार पाडली.

Advertisements
error: Content is protected !!