April 22, 2021

Maharashtra Metro

online news portal

विशेष मोहीमे अंतर्गत चंद्रपूर जिल्हयात अवैध दारूविक्री करणाऱ्यांवर कार्यवाही

डॉ महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रपूर  जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी. मोहाची  दारू विकणार वाल्या वर कारवाई करण्यात आली व मोठ्या प्रमाणाात दारू साठा जप्त करण्यात आल

दि१९/०६/२०२० रोजी पोलीस अधीक्षक चंद्रपुर डॉ. महेश्वर रेड्डी, यांचे आदेशान्वये विशेष मोहीम राबवुन जिल्हयातील विविध पोलीस स्टेशन अंतर्गत वेगवेगळे पथके तयार करून तसेच नाकेबंदी व छापे टाकुन अवैध दारूचा साठा जप्त करण्यात आले सदर कार्यवाहीमध्ये जिल्हयातील ७ पोलीस उपविभागातील सर्व पोलीस स्टेशन स्तरावर विशेष पथके तयार करून अवैध दारू व्यवसायीकांवर कार्यवाही करण्याचे मा. पोलीस अधीक्षक यांनी आदेशीत केले होते.

सदर विशेष मोहीमेत चंद्रपुर शहर, रामनगर, बल्लारशाह, घुगुस, दुर्गापुर, वरोरा, भद्रावती, नागभिड, सिंदेवाही, मूल, पाथरी, सावली, पोंभुर्णा, गोंडपिपरी, राजुरा, विरुर, कोठारी, गडचांदूर, कोरपना, चिमुर, शेगाव अंतर्गत संबधीत पोलीस पथकाने प्रभावी कार्यवाही करीत दारू तस्करी आणि विक्री करणान्याच्या विरूध्द जिल्हयात एकुण ७३ गुन्हयाची नोंद करण्यात आली असुन ३२ आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. तसेच एकुण ५०,७८,५५०/-रू. चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

Advertisements
error: Content is protected !!