April 15, 2021

Maharashtra Metro

online news portal

लॉकडाऊन काळातील विजेचे बिल भरण्याकरिता किस्ती प्रमाणे बारा महिन्यांची मुदत द्या = मनसे ची मागणी

प्रति युनिट किमान दर लावा, व्याज व विलंब शुल्क आकारु नका

देशात कोरोना चा संसर्ग  रोखण्याकरिता संपूर्ण लॉक डाऊन केला. सर्व उद्योग धंदे ,व्यवसाय ,बाजारपेठा ,बसस्थानके, व्यावसायिक संकुले आदी सर्व कडकडीत बंद करण्यात आले .जमावबंदी ,संचारबंदी लागू करण्यात आली होती .त्यामुळे बऱ्याच लोकांच्या नोकऱ्या गेल्या अनेक बेरोजगार झाले.दोन वेळच्या जेवणा करिता देखील अनेक लोक हे सरकारी मदतीवर अवलंबून होते. अशी सर्व लॉकडाऊन काळातील तीन महिन्याची स्थिती होती. अद्याप त्या स्थितीत पूर्णत: सुधार झालेला नाही. कारण कोरोनाचा अद्याप गेला गेला नाही.

सर्वसामान्य जनतेचे आर्थिक कंबरडे मोडले आहे.असे असताना देखील विद्युत ग्राहकांना तीन महिन्याचे एकत्रित हजारोच्या घरात वीज बिल पाठवण्यात आले आहे. त्यामुळे सर्व नागरिकांमध्ये सरकार विरोधात व महावितरण विरोधात रोष आहे. महावितरण सहा महिन्याची मुदत वीज बिल भरण्याकरीता देत आहे पण ते पुरेसे नाही. 6 महिन्यात कोरणा जात नाही.

नागरिकांचा रोष लक्षात घेता मनसे नगरसेवक तथा जिल्हा उपाध्यक्ष सचिन भोयर यांनी महावितरण मंडळ कार्यालय बाबुपेठ येथे मनसे पदाधिकारी व नागरिकां समवेत धडक दिली व सोशल डिस्टंसिंग ठेवत महावितरणाच्या या भोंगळ कारभाराविरोधात निदर्शने केली .माननीय अधीक्षक अभियंता यांची भेट घेऊन मनसेच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. त्यात प्रामुख्याने तीन ठळक मागण्या करण्यात आल्या आहे

त्यात लॉकडॉउन काळातील तीन महिन्याचे वीज बिल भरणे करिता 12 महिन्यांची मुदत द्यावी. लॉकडॉउन काळातील वापरलेल्या युनिटवर प्रति युनिट किमान दर 3.46 रुपये लावावा तसेच विलंब आकार शुल्क व व्याज माफ करावे आदी सर्व मागण्या करण्यात आल्या.

Advertisements

निवेदनाची प्रत माननीय ऊर्जामंत्री महाराष्ट्र राज्य यांनादेखील पाठवण्यात आली .जनहितार्थ निवेदनाची दखल न घेतल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला .यावेळी मनसे महिला जिल्हाध्यक्षा सौ सुनिता ताई गायकवाड ,शहराध्यक्ष मनदीप रोडे, शहर संघटक मनोज तांबेकर,जिल्हा सचिव अर्चना आमटे, शहर उपाध्यक्ष प्रीती रामटेके ,शहर उपाध्यक्ष महेश वासलवार ,शहर उपाध्यक्ष महेश शास्त्रकार,नितेश जुमडे ,राकेश पराडकर,

Advertisements
error: Content is protected !!