April 18, 2021

Maharashtra Metro

online news portal

चंद्रपूर जिल्हातील अॅक्टीव्ह बाधीताची संख्या २८ आतापर्यंतचे बाधीत ५३

 

चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कालची १६ जून रोजीची पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या एकूण पाच झाली आहे. १६ जूनच्या रात्री आणखी एक पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाल्याची माहिती आरोग्य यंत्रणेने आज बुधवारी दिली आहे.
नवी दिल्ली नजीकच्या गुडगाव या शहरातून १२ जून रोजी चंद्रपूर शहरात दाखल झालेल्या ३२ वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. हा व्यक्ती गुडगाव येथून आल्यानंतर संस्थात्मक अलगीकरणात होता. १५ जून रोजी लक्षणे आढळल्यामुळे त्यांचा स्वॅब घेण्यात आला.१६ जून रोजी रात्री उशिरा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मात्र प्रकृती स्थिर आहे.

तत्पूर्वी काल मंगळवारी चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा व बल्लारपूर या तालुक्याच्या ठिकाणी आणखी तीन व ब्रह्मपुरी तालुक्यामधील मालडोंगरी गावातील एका युवकाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला होता. असे एकूण ५ पॉझिटीव्ह मंगळवारी आढळल्यामुळे जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार जिल्हयात कोरोना पॉझिटीव्ह रुग्णाची संख्या ५३ झाली आहे.

काल सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये राजुरा येथील साई नगर भागातील २७ वर्षीय युवक कोरोना बाधित ठरला होता.हा युवक अहमदाबाद वरून परत आल्यानंतर संस्थात्मक अलगीकरणात होता.
तर बल्लारपूर शहरातील टिळक नगर भागातील आई आणि मुलगी सुरत शहरातून आल्यानंतर गृह अलगीकरणात होते. परवा घेण्यात आलेले या तिघांचेही स्वॅब काल पॉझिटीव्ह ठरले होते.
यामध्ये ब्रह्मपुरी तालुक्यातील मालडोंगरी येथील मुंबईवरून आलेल्या १९ वर्षीय युवकाला संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्यात आले होते. त्याला लक्षणे दिसल्यानंतर ब्रह्मपुरी कोविड केअर सेंटरमध्ये हलविण्यात आले. १५ जूनला त्याचा स्वॅब घेण्यात आला. हा युवक कोरोना बाधीत असल्याचे काल सकाळी पुढे आले आहे.त्यामुळे आजच्या एकूण ५ बाधीतांमुळे चंद्रपूर जिल्हयातील बाधीत रुग्णाची संख्या ५३ झाली आहे. सर्व पाचही बाधीताची प्रकृती स्थिर आहे.

चंद्रपूरमध्ये आतापर्यत २ मे ( एक बाधीत ), १३ मे ( एक बाधीत) २० मे ( एकूण १० बाधीत ) २३ मे ( एकूण ७ बाधीत ) व २४ मे ( एकूण बाधीत २ ) २५ मे ( एक बाधीत ) ३१ मे ( एक बाधीत ) २जून ( एक बाधीत ) ४ जून ( दोन बाधीत ) ५ जून ( एक बाधीत ) ६जून ( एक बाधीत ) ७ जून ( एकूण ११ बाधीत ) ९ जून ( एकूण ३ बाधीत ) १०जून ( एक बाधीत ) १३ जून ( एक बाधीत ) १४ जून ( एकूण ३ बाधीत ) १५ जून ( एक बाधीत ) १६ जून ( एकूण ५ बाधीत ) अशा प्रकारे जिल्हयातील कोरोना बाधीत ५३ झाले आहेत.आतापर्यत २५ बाधीत बरे झाल्याने सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे ५३ पैकी अॅक्टीव्ह बाधीतांची संख्या आता २८ झाली आहे.

Advertisements
Advertisements
error: Content is protected !!