
चंद्रपूर : दारूविक्रीसाठी कुप्रसिद्ध असलेल्या कंजर मोहल्ल्यात आज स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करीत दारूने भरलेली स्कॉर्पिओ गाडी जप्त केली. वाहनाला पकडून हा 17लाखांचा आहे. स्थानिक गुन्हे शाखेची ही मोठी कारवाई मानली जात आहे.
चंद्रपूर रेल्वे स्थानकाकडून कंजर मोहल्याकडे एक स्कॉर्पिओ वाहन देशी आणि विदेशी पेट्यानी भरलेला माल घेऊन जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानुसार कारवाई करीत हे वाहन पकडण्यात आले. तपासणी केली असता त्यात 50 पेट्या विदेशी तर 12 पेट्या देशी दारू आढळून आली. ही दारू विष्णू कंजर या आरोपीची असल्याचे निष्पन्न झाले. घटनास्थळातून चालक फरार झाला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे यांच्या मार्गदर्शनात राजेंद्र खडके नाईन खान पठाण जमीर खान पठाण जावेद सिद्दिकी अनुप डांगे यांनी ही कारवाई केली
More Stories
प्रशासनावरील सामान्य जनतेचा विश्वास घट्ट ठेवा: डॉ. कुणाल खेमनार
जिल्हाधिकाऱ्यांच्या बदलीविरोधात जन विकास सेनेचे आंदोलन उद्यापासून सर्वपक्षीय आंदोलन करणार
स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही आरोपीकडुन एक विदेशी पिस्टल आणि गुप्ती हस्तगत