
चंद्रपूर प्रतिनिधी :- लॉक डाऊन च्या काळात अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणात फोफावले असताना दुसरीकडे सट्टापट्टी आणि जुगार खेळण्याचा प्रकार सुद्धा वाढला आहे. काही महिन्यापूर्वी जुनोना जंगल परिसरात रामनगर पोलिस स्टेशनच्या पथकाने जुगार अड्ड्यावर धाड टाकली होती मात्र त्यामधे एका पोलिस अधिकारी यांनी तब्बल चार ते पाच लाख रुपये हडप करून काही हजाराचा मुद्देमाल दाखवला होता. आता त्यापैकी जुगार खेळणाऱ्या काही जुगारांना बल्लारपूर पोलिस निरीक्षक भगत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने धाड टाकून तब्बल १८ जुगाराना रंगेहाथ अटक केल्याची घटना आज सायंकाळी ५ च्या दरम्यान घडली असून तब्बल ११ लाख २७ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.
हो घटना बल्लारपूर पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या जुनोना तलाव जवळ जंगलात घडली असून चंद्रपूर रहिवासी काही इसम मोठया प्रमाणात तीन पत्ती जुगार खेळत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक मलिक, उपपोलिस निरीक्षक सचिन यादव(पडोली), उपपोलिस निरीक्षक प्रवीण सोनुने(दुर्गापूर)यांच्या संयुक्त पथकाने साय,5च्या दरम्यान रामाला तलाव इथे जुगार खेळताना 18 आरोपींना रंगेहाथ पकडले, व त्यांचा कडून रोख रक्कम अंदाजे चार लाख,२० मोबाईल, दोन मोपेड, एक ऑटो रिक्षा, असे मिळूनअंदाजे अकरा लाख 27 हजार रु, चा मुद्दे माल जप्त करण्यात आलाअसून सर्व आरोपी चंद्रपूर रहिवासी असल्याची माहिती आहे.त्या सर्वाना मुद्देमाला सह बल्लारपूर पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आले असून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली, ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांचा मार्गदर्शनात उपविभागीय पोलिस अधिकारी जाधव व पोलिस निरीक्षक भगत यांचा संयुक्त पथकाने केली,
More Stories
जिल्ह्यात डॉ. भास्कर सोनारकर यांना सर्वप्रथम कोविशिल्ड लसीचा डोज
वाहनांचा अपघात करणार्या चालकांना अभयदान – न्यायाधिककाऱ्यांचा अजब निवाडा
अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूकीवर प्रशासनाची धडक कारवाई