जिल्ह्याच्या सीमेवर नक्षल्यांच्या हालचाली
सीमावर्ती ठाण्यांच्या बंदोबस्तात वाढ; एलसीबीतील ३१ पोलिस कर्मचाऱ्याच्या बदल्या
चंद्रपूर ता. ९ : लॉकडाउनमुळे पोलिस कर्मचाèयांवरील कामाचा ताण आधीच वाढला आहे. अशात तेलंगणा राज्याच्या सीमा परिसरात नक्षलवाद्यांच्या गुप्त हालचाली सुरू असल्याची माहिती समोर आली. त्यामुळे पोलिस प्रशासन सज्ज झाले आहे. नक्षल्यांच्या बिमोडासाठी पोलिस विभागाने जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात तगडा बंदोबस्त करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेतील तब्बल ३१ पोलिस कर्मचाèयांच्या तडकाफडकी बदल्या केल्या. पोलिस अधीक्षकांनी सोमवारी (ता. ८) बदलीचे आदेश काढले. गृहमंत्र्याच्या जिल्हा भेटीनंतर अवघ्या दोन दिवसांत बदल्या झाल्याने पोलिस वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.
चंद्रपूर जिल्ह्याची सीमा तेलंगणा राज्याला लागून आहे. जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात विरूर स्टे., लाठी, धाबा, भारी, गोंडपिपरी, वणी कॅम्प, टेकामांडवा, जिवती, पिटीगुड्डा येथे पोलिस ठाणे, उपपोलिस ठाणे कार्यरत आहेत. उपलब्ध मनुष्यबळावर या ठाण्यांचा कारभार सुरू आहे.
अशात तेलंगणा राज्यात नक्षलवाद्यांनी गुप्त हालचाली सुरू केल्याची माहिती पोलिस विभागाला प्राप्त झाली. त्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी सीमावर्ती भागातील पोलिस ठाण्यांत तगडा बंदोबस्त वाढविण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी सोमवारी तातडीने बदलीचे आदेश जारी करीत स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत ३१ कर्मचाèयांना संबंधित पोलिस ठाण्यांत रुजू होण्याचे निर्देश दिले आहेत.
विरूर पोलिस ठाण्यात पद्माकर भोयर, पंडित वèहाडे, महेंद्र भुजाडे, लाठी येथे रवींद्र बोरकर, सुरेश केमेकर, धनराज करकाडे, धाबा येथे राजेंद्र खनके, संजय आकुलवार, प्रकाश बल्की, भारी येथे मनोज रामटेके, अविनाश दशमवार, अनुप डांगे, प्रफुल्ल मेश्राम, मिqलद जांभुळे, अमजद पठाण, गोंडपिपरी येथे नईम खान, अमोल धंदरे, कुंदनqसग बावरी, वणी कॅम्प येथे विनोद जाधव, रवींद्र पंधरे, प्रांजल झिलपे, गजानन नागरे, जावेद सिद्दीकी, टेकामांडवा येथे संतोष बगमारे, नितीन रायपुरे, प्रशांत नागोसे, जिवती येथे गोपाल आतुलवार, संदीप मुळे, पिट्टीगुडा येथे मयूर येरणे, जमीर पठाण, मिqलद चव्हाण यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. पुढील आदेशापर्यंत या कर्मचाèयांना संबंधित पोलिस ठाण्यात बंदोबस्तासाठी कायम ठेवण्यात येणार आहे.
स्थानिक गुन्हे शाखेतील कर्मचाèयांच्या बदल्या करण्यात येणार असल्याची चर्चा मागील अनेक महिन्यांपासून होती. कोरोनाच्या एन्ट्रीनंतर ही चर्चा थांबली. मात्र, आता नक्षलवाद्यांच्या गुप्त हालचाली वाढल्याचे कारण पुढे करीत एलसीबीतील तब्बल ३१ पोलिस कर्मचाèयांच्या तातडीने बदल्या करण्याचा निर्णय पोलिस अधीक्षकांनी घेतला आहे. विशेष म्हणजे, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दोन दिवसांपूर्वी जिल्ह्याला भेट दिली. त्यानंतर अचानक बदल्या करण्यात आल्याने पोलिस कर्मचारी वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना ऊत आला आहे.
एलसीबीतील अवघे चार अधिकारी
पोलिस विभागात स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) ही महत्त्वाची शाखा मानली जाते. जिल्ह्यात कुठेही कारवाई करण्याची त्यांना परवानगी असते. पोलिस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे यांच्याकडे या शाखेच्या निरीक्षकपदाचा प्रभार आहे. सहा वेगवेगळ्या पथकामाङ्र्कत शाखेचे काम सुरू आहे. मात्र, अचानक ३१ पोलिस कर्मचाèयांच्या बदल्या करण्यात आल्याने सर्व पथके रिकामी झाली. सद्यःस्थितीत कोकोटे यांच्या मदतीला गदादे, बोबडे, मुंडे ही पोलिस अधिकारी मंडळी सोबतीला आहे.
More Stories
स्टंटबाजी करणाऱ्याच्या आवळल्या मुसक्या रामनगर पोलिसांनी दोन आरोपीला घेतलं ताब्यात
1 फेब्रुवारीपासून दुचाकीवर हेल्मेटचा वापर अनिवार्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी जिल्हाधिकरी अजय गुल्हाने यांचे आदेश
सरपंच पदाचे आरक्षण 29 व 30 जानेवारीला