लॉकडाऊन दरम्यान लॉन तसेच नॉन एसी सभागृहांमध्ये लग्न समारंभासाठी परवानगी द्यावी अशी मागणी माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी शासनाकडे केली आहे.
सदर मागणी संदर्भात मुख्यमंत्री, मुख्य सचिव तसेच मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव यांना त्यांनी ई-मेल द्वारे पत्रे पाठविली आहेत. या संदर्भात मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे यांच्याशी दुरध्वनी द्वारे चर्चा सुध्दा केली आहे.
या मागणी संदर्भात आपली भुमिका मांडताना त्यांनी म्हटले आहे की, कोरोना विषाणुचा राज्यातील वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सुरु असलेल्या लॉकडाऊन दरम्यान गर्दी टाळण्याच्या दृष्टीने केवळ 50 लोकांच्या मर्यादेत सोशल डिस्टंसिंग पाळत लग्न समारंभ साजरा करण्याची परवानगी देण्यात आली आहे. हे समारंभ घराच्या परिसरात करावे असे शासनाचे निर्देश आहेत. साधारणतः घरे लहान असतात त्यामुळे 50 लोकांच्या मर्यादेत सुध्दा घराच्या परिसरात लग्न समारंभ साजरे करणे अडचणीचे ठरत आहे.
त्यामुळे नॉन एसी सभागृह किंवा लॉनमध्ये लग्न समारंभासाठी परवानगी दिल्यास ते अधिक उत्तम ठरेल. लॉन किंवा नॉन एसी सभागृहामध्ये सोशल डिस्टंसिंगचे योग्य पालन सुध्दा करता येईल. ही बाब लक्षात घेता लॉन तसेच नॉन एसी सभागृहांमध्ये लग्न समारंभासाठी परवानगी द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
घरी किंवा परिसरात लग्न समारंभ साजरे होताना सोशल डिस्टंसिंगचे योग्यरित्या पालन होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे लॉन किंवा नॉन एसी सभागृहामध्ये लग्न समारंभ साजरे झाल्यास ते सुरक्षित पाऊल ठरेल असेही आ. मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.
More Stories
मनसे जनहित कक्ष जिल्हाध्यक्ष आकाश भालेराव यांचे कोरोनाने आज पहाटे पाच वाजता दुःखद निधन
राज्यात पुन्हा कडक लाॅकडाऊन मुख्यमंत्री घेणार निर्णय
खासगी कोव्हिड रुग्णालयांनी नियमित निर्जंतुकीकरण करावे