अहवाल आला आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेने दिलेल्या वृत्तानुसार चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या २५ झाली आहे.
२५ मे रोजी हरियाणातील गुडगाव येथून सदर व्यक्ती नागपूरला विमानाने आले. नागपूर वरून स्वतःच्या वाहनाने मूल येथे आल्यानंतर त्यांना गृह अलगीकरण करण्यात आले. 3 जून रोजी गृहअलगीकरणामध्ये असताना त्यांचा स्वॅब घेण्यात आला होता. आज तो पॉझिटिव्ह आला असून त्यांच्या कुटुंबातील अन्य सहा सदस्यांचे देखील आज स्वॅब घेण्यात येणार आहे. सदर व्यक्तीला चंद्रपूर येथे विलगीकरण कक्षामध्ये ठेवण्यात आले आहे.
चंद्रपूरमध्ये आतापर्यत २ मे ( एक रुग्ण ), १३ मे ( एक रूग्ण) २० मे ( एकूण १० रूग्ण ) २३ मे ( एकूण ७ रूग्ण ) व २४ मे ( एकूण रूग्ण २ ) २५ मे ( एक रूग्ण ) ३१ मे ( एक रुग्ण ) २जून ( एक रूग्ण ) ४ जून ( एक रुग्ण )अशा प्रकारे जिल्हयातील रुग्ण २५ झाले आहेत.आतापर्यत २२ रुग्णांना बरे झाल्याने सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे २५ पैकी अॅक्टीव्ह रुग्णाची संख्या आता ३ आहे.
More Stories
घुग्गुस वासियांच्या मनातील प्रेमाचे स्थान आमच्यासाठी महत्वाचे – आ. सुधीर मुनगंटीवार
घंटाचौकीजवळ पकडला दारूचा ट्रक ३७ लाखांचा मुद्देमाल जप्त दोन आरोपी अटकेत स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
भद्रावतीकरांच्या स्वागताने भारावून गेलो, संवाद साधण्याकरीता पुन्हा नक्की येईन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचे भावोद् गार