April 22, 2021

Maharashtra Metro

online news portal

मध्यरात्री युनियन बँकेला आग

चंद्रपूर : शहरातील मध्यवर्ती भागातील छोटा बाजार चौकातील युनियन बँकेच्या कार्यालयात काल मंगळवारला रात्री आग लागली. रात्री ११ वाजताच्या सुमाराला घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली.

आगीची माहिती होताच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येत बँकेच्या समोर गोळा झाले. यावेळी प्रशासनाच्या सामाजिक अंतराचे आदेशही पायदळी तुडविण्यात आले.घटनेची माहिती होताचा बँकेचे अधिकारी पोहचले. आत मोठ्या प्रमाणात रोकड होती.

त्यामुळे ती जळण्याची भिती निर्माण झाली. दरम्यान अग्निशमन दल आणि पोलिस पोहचले. एका तासाच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. बँकेला लागूनच दाटीवाटीने निवासी वस्ती आहे. आग वेळीच आटोक्यात आली तर मोठा अनर्थ झाला असता. आग नेमकी कशामुळे लागली, याच कारणांचा शोध घेतला जाणार आहे. जवळपास दहा लाख रूपयांचे नुकसान झाले, अशी माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी शीलवंत नांदेडकर यांनी दिली.

Advertisements
error: Content is protected !!