April 15, 2021

Maharashtra Metro

online news portal

दुचाकी चोरट्यास विठ्ठलमंदिर वार्ङातून अटक

आज दिनांक 2 जून रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी विठ्ठल मंदिर वार्ड परिसरात पेट्रोलिंग करत असताना गुप्त माहितीच्या आधारे माहिती मिळाली की, चंद्रपूर शहर व रामनगर पोलीस स्टेशन रेकॉर्डवरील गुन्हेगार साहिल उर्फ बाल्या राजू आंबेकर (21 वर्ष) हा दुचाकी चोर येथे आहे. त्याची चौकशी करण्यात आली. त्याच्याकडून चोरीची होंडा मोपेड विना क्रमांकाची गाङी 50 हजारासह सह ताब्यात घेण्यात आले.

सदर मोपेड गाडी ही बाबटनगर परिसरातून चोरी गेली होती. सदर गुन्हेगारांकडून यापूर्वीही स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चोरी घरफोडी या प्रकरणात गुन्हे उघडकीस आणले होते. आरोपी साहिल ऊर्फ राजू आंबेकर राहणार विठ्ठल मंदिर वार्ङ विरुद्ध रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार क्रमांक 49/ 20 भादंवि 379 गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संजय आकतूलवार,पोलीस शिपाई अमजद खान, पोलीस शिपाई प्रशांत नागोसे, विनोद जाधव, मयूर येरमे यांनी केली.

Advertisements
error: Content is protected !!