April 18, 2021

Maharashtra Metro

online news portal

ब्रम्हपुरी शहरात कोणतेही अवैध धंद्यांना थारा दिला जाणार नाही. ब्रम्हपुरी शहर हे शांत शहर आहे. आणि येथे कोणाचीही भाईगिरी चालणार नाही..

नवयुक्त पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना पत्रकार परिषद मध्ये पत्रकारांसोबत बोलताना सांगितले

ब्रम्हपुरी हे विदर्भात विद्यानगरी व आरोग्यनगरी म्हणून ओळखल्या जाते. ब्रम्हपुरी तालुका मोठा असल्याने येथील शांती व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी नेहमी जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी कर्तव्यदक्ष अधिकार्‍यांची नेमणूक केली जाते. काही दिवसांपूर्वी ब्रम्हपुरी येथील सतत वादग्रस्त ठरलेले पोलीस निरीक्षक प्रमोद मक्केश्वर यांची तडकाफडकी चंन्दपुर येथे बदली करण्यात आली. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी सावली येथे कार्यरत असलेले कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना ब्रम्हपुरी पोलिस स्टेशनचा प्रभार सोपविण्यात आले.

 

लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्या प्रत्रकारांना नेहमीच पोलीस प्रशासनाकडून सम्मान दिला जातो. व आपले कर्तव्य समजून नवयुक्त पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी ब्रम्हपुरी तालुक्यातील सर्व प्रत्रकारांना सदिच्छा भेटला आमंत्रित केले. आपला परिचय देत सर्व प्रत्रकारांनी परिचय देऊन या भेटीत गोडवा निर्माण केला.

 

यावेळी नवयुक्त पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी आपण सर्व मिळून काम करण्याची इच्छा व्यक्त केली. आपण मला सहकार्य करावे. या शहरात कोणतेही अवैध धंद्यांना थारा दिला जाणार नाही. ब्रम्हपुरी शहर हे शांत शहर आहे. पण येथे कोणाचीही भाईगिरी चालणार नाही.

 

प्रत्रकार हा समाजाचा एक महत्त्वाचा घटक आहे. ब्रम्हपुरी पोलिस स्टेशन येथे त्यांना सदैव सम्मान दिला जाणार व आपल्या सहकार्याने ब्रम्हपुरी शहरात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी महत्त्वाची भूमिका असेल. प्रत्रकारांनी सुध्दा नवयुक्त पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना मिट द पत्रकार परिषद आमंत्रित करण्यात आले. ते स्विकारत आपण नेहमीच प्रत्रकारांच्या सोबत असल्याचे मत व्यक्त केले.

Advertisements
Advertisements
error: Content is protected !!