April 18, 2021

Maharashtra Metro

online news portal

नवरा बायकोच्या हत्या की आत्महत्या? घुग्गुस परिसरातली धक्कादायक घटना घुगुस पोलीस तपास करीत आहे

चंद्रपूर : घुग्घुस येथील महातारदेवी रोडवरील वॉर्ड क्र. 06 मधील साहनी कॉम्प्लेक्स येथे भाडयाने राहणारे देबाशीष रॉय वय 40 वर्ष, राहणार कोलकत्ता व शेषी किरण टोपे वय 32 वर्ष रा. बिलासपुर छत्तीसगढ़ यांचे शव दोन वेग – वेगळ्या खोलीमध्ये सीलिंग फैनला लटकुन आत्महत्या केल्याचे निर्दशणास आले मात्र तेथील परिस्थिति व विसंगती पाहुन हे हत्या की आत्महत्या असा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.

येथील कोरकंटी यांच्या निवास्थानात हे दंपत्ती मागील तीन वर्षापासून भाडयाने राहत होते.

हे दोघे बियोंड पॉवर निर्मल बैंग नावाच्या शेयर मार्केटिंग कंपनी मध्ये कार्यरत होते.

यांचे कार्यालय राजीव रतन चौक येथील असलम काम्प्लेक्स मध्ये होते.

Advertisements

आज दिनांक 27 में रोजी दुपारी 1.30 वाजता प्रवीण कोंकटी यांनी देबाशीष रॉय यांच्या मोबाईलवर कॉल केला मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

ते उत्तर देत नाही म्हणून त्यांच्या पत्नीच्या मोबाईलवर कॉल केला मात्र त्यांनी ही उत्तर न दिल्यामुळे त्यांनी प्रत्यक्ष जावून दार वाजवून आवाज़ दिला मात्र दार आतून बंद होते व कुठलाच प्रतिसाद येत नसल्यामुळे त्यांनी घुग्घुस पोलीस स्टेशनला सूचना दिली असता पोलीस उप – निरीक्षक वीरसेन चहांदे, पी.एस. डोंगरे,यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी जावून दरवाजा तोडला असता सीलिंग फैनला लटकलेले मृतदेह निर्दर्शनास आले.

व त्यांच्या शेजारी लिखीत स्वरुपात माफीनामा मिळाला

घटनेची माहिती मिळताच उप – विभागीय पोलीस अधिकारी नांदेड़कर हे घटनास्थळी तातळीने दाखल झाले.

पुढील तपास घुग्घुस पोलीस करीत आहे.

घुग्घुस येथे मृतकानचे नातेवाईक नसल्यामुळे शव विच्छेदना नंतर चंद्रपुर येथील शवाग़ारगृह्यत ठेवण्यात येईल.

मात्र पति – पत्नी यांच्या आत्महत्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून हत्या की आत्महत्या या तर्क – वितर्काला उधान आले आहे.

Advertisements
error: Content is protected !!