January 24, 2021

Maharashtra Metro

online news portal

वार्ड क्र. 5 विसापूर येथील प्रतिबंधीत क्षेत्रात आ. सुधीर मुनगंटीवार यांनी तातडीने पोहचविली मदत जीवनावश्यक वस्‍तुच्‍या किट्स व भाजीपाला वितर

बल्‍लारपूर तालुक्‍यातील विसापूर येथे दिनांक 24 मे रोजी आणखी एक रूग्‍ण कोरोना पॉझिटीव्‍ह आढळल्‍याने या परिसरातील वार्ड नं. 5 हा भाग प्रतिबंधीत करण्‍यात आला आहे. तेथील नागरिकांनी माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांना दूरध्‍वनीद्वारे प्रतिबंधामुळे निर्माण झालेल्‍या अडचणी सांगत मदतीची मागणी केली. आ. मुनगंटीवार यांनी तात्‍काळ नागरिकांच्‍या मागणीची दखल घेत भाजपा पदाधिका-यांची चमू सदर परिसरात पाठवून मदत पोहचविली.
वार्ड क्र. 5 विसापूर येथील प्रतिबंधीत क्षेत्रात 320 जीवनावश्‍यक वस्‍तुंच्‍या किट्स व भाजीपाला यासह मास्‍क, डेटॉल साबण, बिस्‍कीट पुडे यांचे वितरण भाजपा पदाधिका-यांच्‍या माध्‍यमातुन करण्‍यात आले. यावेळी भाजपाचे तालुकाध्‍यक्ष किशोर पंदिलवार, जिल्‍हा परिषद सदस्‍य हरीश गेडाम, जिल्‍हा परिषद सदस्‍य ब्रिजभूषण पाझारे, पंचायत समितीचे माजी सभापती गोविंद पोडे, चंद्रपूरचे उपमहापौर राहूल पावडे, बंडू बावणे, डॉ. मंगेश गुलवाडे, प्रकाश धारणे, दत्‍तप्रसन्‍न महादाणी, उज्‍वल धामनगे यांची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.

या प्रतिबंधीत क्षेत्रातील नागरिकांना कोणतीही अडचण भासल्‍यास आ. मुनगंटीवार यांच्‍या वतीने आम्‍ही त्‍या अडचणींचे निराकरण करण्‍यासाठी सदैव तत्‍पर असल्‍याची ग्‍वाही यावेळी भाजपाचे तालुकाध्‍यक्ष किशोर पंदिलवार यांनी नागरिकांना दिली. केलेल्‍या मागणीची तात्‍काळ दखल घेत मदत पोहचविल्‍याबद्दल या प्रतिबंधीत क्षेत्रातील नागरिकांनी आ. सुधीर मुनगंटीवार यांचे आभार व्‍यक्‍त केले आहे.

Advertisements
error: Content is protected !!