April 15, 2021

Maharashtra Metro

online news portal

दारु चालते मग, चहा का नाही?

 

नागपूर : तीन महिने झाले चहाचे दुकान बंद आहे. दारूचे दुकान सुरू झाले. चहाटपरी उघडण्याची परवानगी मिळाली नाही. दारु चालते मग, चहा का नाही? असा प्रश्न चहा टपरीवर जीवन जगणा-या चहाविक्रेत्याने उपस्थित केला आहे.

लॉकडाउनमुळे चहाचे दुकान तीन महिन्यांपासून बंद आहे. त्यातच लॉकडाउनचा चौथा टप्पा सुरू झाला आहे. यामध्ये चहाटपरी उघडण्याची परवानगी न मिळाल्याने व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. आता चहाचे दुकान कधी उघडेल याचा अंदाज नाही.

चहा, तर्री पोहा आणि नागपूरकर यांचे अतूट नाते आहे. नुकतेच ब्रॅंडेड चहाची दुकाने शहरामध्ये सुरू झाली आहेत. मात्र, वर्षानुवर्षे टपरीवर चहा विकणाऱ्यांची आणि त्याचा आस्वाद घेणाऱ्यांची संख्यादेखील तितकीच आहे. सरकारने आम्हाला मदत करावी, अशी मागणी चहाविक्रेते करत आहेत.
सिव्हिल लाइन, धंतोली, रामदासपेठ, धरमपेठ अशा विविध परिसरामध्ये शे-दोनशे चहाटपरी आहेत. लॉकडाउनमध्ये चहा व्यवसायाला अद्याप सूट न मिळाल्याने हे चहाटपरीवाले संकटात सापडले आहेत.

यातील अनेक व्यावसायिकांनी चहाच्या वेगवेगळ्या शाखा उघडल्या आहेत. तर, अनेक परप्रांतीय चहाविक्रेते यावर आपला उदरनिर्वाह करत आहेत. मात्र, कोरोनामुळे सर्व काही ठप्प झाले आहे. पावसाळ्यातही चहा विक्रीवर कोरोनाचा प्रभाव राहील, असा अंदाज चहा व्यवसायिकांनी व्यक्त केला.

Advertisements
Advertisements
error: Content is protected !!