उलगुलान कामगार खदान संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मुख्य महाप्रबंधक सास्ती कोळसा खदान यांना निवेदनाद्वारे कळवले.
सास्ती ओपन कॉस्ट कोळसा खदान क्षेत्राअंतर्गत येत असलेल्या सास्ती गावाला सध्या तीव्र प्रकारच्या ब्लास्टिंगचा सामना करावा लागत आहे. ओपन कास्ट खदानी मध्ये ते तीव्र स्वरूपाची ब्लास्टिंग केल्यामुळे सास्ती गावातील घरांना मोठ्या प्रमाणात भेगा पडत आहेत. त्यामुळे बऱ्याच घरांची नुकसान झालेली आहे. ब्लास्टिंगच्या तीव्र झटक्याने व आवाजाने घरांची पडझड होत असून एखाद्या वेळी जीवितहानी होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही
.सदर घटना ही अत्यंत गंभीर स्वरूपाच्या असून याबाबत वेकोलि प्रशासनाने ठोस निर्णय घ्यावा व नागरिकांचे घराचे नुकसान झालेले आहे त्याची भरपाई द्यावी. अशी मागणी वेकोलि प्रशासनाकडे उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी केली.
जर निवेदन दिल्यानंतरही तीव्र स्वरूपाची ब्लास्टिंग करण्यात आली व त्यामुळे घरांची पडझड झाली व कोणती जीवितहानी झाली तर याला जबाबदार संबंधित वेकोलि प्रशासन राहील.त्यामुळे सदर प्रकरणाची दखल घेऊन वेकोली प्रशासनाने या गंभीर समस्येकडे तात्काळ लक्ष द्यावे.अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन उलगुलान कामगार खदान संघटनेच्या वतीने करण्यात येईल. मुख्य महाप्रबंधक यांना राजू जोडे, अनिश मानकर श्रीधर राऊलवा, नरेश गुंडापेल्ली, साहिल झाडे, इंद्रदास मेश्राम, निखिल माऊलीकर यांनी निवेदन दिले.
More Stories
सरपंच पदाचे आरक्षण 29 व 30 जानेवारीला
राज्यातल्या हुतात्मा स्मारकांच्या दुरुस्ती व नूतनीकरणाच्या प्रक्रियेत योगदान देवु शकल्याचा मनापासुन आनंद – आ. सुधीर मुनगंटीवार
घुग्गुस वासियांच्या मनातील प्रेमाचे स्थान आमच्यासाठी महत्वाचे – आ. सुधीर मुनगंटीवार