चंद्रपूर – यवतमाळमधून आलेल्या पॉझिटिव्ह युवतीच्या कुटुंबातील सदस्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे. आज हा अहवाल प्राप्त झाल्याने चंद्रपुरकरांना दिलासा मिळाला आहे. 9 मे रोजी ही कोरोनाबाधित युवती यवतमाळ जिल्ह्यातून आपल्या आईला घेऊन चंद्रपूर येथे आली होती. 11 मे रोजी तिची चाचणी केली असता काल 13 मे रोजी तिचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती.बिनबा गेट परिसर सील करण्यात आला आहे.
तसेच चंद्रपूर शहरात जी बाजारपेठ उघडण्याची मुभा देण्यात आली होती. ती जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी मागे घेतली. या युवतीच्या आई-वडील आणि काका-काकू यांच्या घशातील स्रावाचे नमुने काल तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. ज्याचा अहवाल आज निगेटिव्ह आला. ही युवती आईच्या उपचारासाठी यवतमाळ येथे 9 एप्रिलाला गेली होती. जवळपास एक महिन्याने ती परतली होती. त्यामुळे हा संसर्ग इतक्यातच झाला असल्याची शक्यता आहे. कोरोनाबाधित युवतीच्या संपर्कात आलेल्या इतर व्यक्तींचा देखील शोध घेतला जात आहे.
Daru cha Black market nantr Chndrpur shahrat Pan Material cha pn kala market suru ah 300 rs Kg chi supari 800rs kg vikt ah ani Tambakhu 10Patine jast darat viklya jat ah.Cigarets MRP peksha jaat rate mdhe viklya jat ah.
He Garjecha Wastu nai ah tri pn lokana pahij ahet mnun pan material vyaparyani loot lawleli ah….ek tr sagdya pan material cha maal japt krawa nai tr dukan open krun taka jene krun wholesale vyaparyachya tijorya bhrlya janar nai