April 22, 2021

Maharashtra Metro

online news portal

दारू तस्करी अडकला चंद्रपूर चा पुलिस कमी, शिरपूर पोलिसांनी आवळल्या मुसक्या

७५० एम एल च्या १२ विदेशी बम्पर अंदाजे १६ हजार ची दारू सह कार सुद्धा जप्त !

चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी असली तरी जवळच्या यवतमाळात जिल्ह्यातील वणी तालुक्यातून मोठ्या प्रमाणात अवैध दारूची वाहतूक सुरू असते आणि हे पोलिसांच्या छुप्या सहकार्याशिवाय शक्य नाही त्यामुळे पोलीसच खऱ्या अर्थाने अवैध दारू व्यवसायात गुंतले असल्याचे दिसत आहे अशातच आता चक्क पोलिसच जर अवैध दारू वाहतूक करीत असेल तर विश्वास ठेवायचा कुणावर ? हा प्रश्न आता जिल्हा पोलिस अधिक्षक यांच्या समोर उभा ठाकला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार कोरोनामुळे संपूर्ण लॉक डाऊन करण्यात आले आहे,

या दरम्यान मोठ्या प्रमाणात दारूची तस्करी सरू होती पोलिसांकडून अनेक दारू तस्करावर कारवाही करण्यात आली होती. मात्र आता चक्क पोलीस शिपाईच दारू तस्करी करीत असल्याचे आढळून आले असून शिरपूर पोलिसांनी चंद्रपूर येथे कार्यरत असलेल्या पोलीस शिपायाला दारूची तस्करी करतांना अटक केल्याने पोलीस विभागात खळबळ उडाली आहे.

कोरोना विषाणूजन्य आजारा ने जगाला हादरून सोडले आहे. त्यामळे संपूर्ण जगा सह भारतात देखील मागील दीड महिन्या पासून लॉक डाऊन करण्यात आले आहे. त्यामळे जनजीवन विस्कळीत झाले आहे, या दरम्यान दारूचे दकानही बंद करण्यात आल्याने तळीरामांची मोठी फजिती झाली होती. तळीरामांचे चोचले पुरवण्या करिता अवैध दारू विक्री सुरू झाली होती.

मात्र चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी असल्याने येथील मध्यपीची नजर वणी कडे होती. जिल्ह्याधिकारी यांच्या आदेशाने दि. ११ मे पासून यवतमाळ जिल्ह्यात दारू विक्रीला परवानगी दिल्याने चंद्रपूर जिल्ह्यातील मध्यप्रेमीचा ओढा शहराकडे वळला होता. आड रस्त्याच्या मागाने अनेक जण वणीत येऊन आपली सोय भागवित आहे.

Advertisements

महत्वाची बाब म्हणजे यात पोलिसही मागे राहिले नाही चंद्रपूर पोलीस मख्यालयात कार्यरत असलेला पोलीस शिपाई मोरेश्वर गोरे वय ३४ हा एम एच २६ य ०७८६ या टाटा सफारी वाहनाने वणीत गेला व त्याने विदेशी दारूचे ७५० एम एल चे १२ बंपर दारू घेतली व तो चंद्रपूर चे दिशेने निघाला. शिरपूर पोलीस ठाण्या हद्दीत येत असलेल्या बेलोरा केलेल्या नाकाबंदी दरम्यान या वाहनांची तपासणी करण्यात आली असता
वाहनना मधे सोळा हजार रुपये किमतीची विदेशी दारू आढळून आली.

वाहन चालवत असलेल्या गोरे याला ताब्यात घेतले असता त्याने आपण पोलीस असल्याची बतावणी केल्याने शिरपूरचे ठाणेदार अनिल राऊत अवाक झाले मात्र गन्हा तो गन्हा असतो मग तो पोलिस असो की कुणीही असो कायदा सर्वांना लागू असल्याची प्रचिती देत त्याला ताब्यात घेऊन चार लाख रुपये किमतीचे वाहन जप्त करून गन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसच दारू तस्करी करीत असताना आढळून आल्याने पोलिसांच्या कार्यप्रणाली वर प्रश्न चिन्ह निर्माण झाले असून याची चांगलीच चर्चा पोलिस विभागात होत आहे.

Advertisements
error: Content is protected !!