April 15, 2021

Maharashtra Metro

online news portal

बल्लारपुरातील पोलिसांची आरोग्य तपासणी

चंद्रपुर जिल्हा भाजप कोरोना योद्ध्यांच्या मदतीला
आ.सुधीर मुनगंटीवार तर्फे पोलिसांना आरोग्य किटचे वितर

बल्लारपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सर्व पोलिसांची आज बुधवार (१३मे)तज्ञ डॉक्टर मंडळी कडून आरोग्य तपासणी करण्यात आली. भारतीय जनता चंद्रपुर, जिल्हा तर्फे आयोजित या उपक्रमात आ.सुधीर मुनगंटीवार याचे तर्फे सर्व पोलिसांना आरोग्य किटचे वितरण भाजपा जेष्ठ नेते चंदनसिंह चंदेल व भाजपा जिल्हा अध्यक्ष हरीश शर्मा यांचे हस्ते करण्यात आले.

यावेळी आय एम ए चे उपाध्यक्ष डॉ मंगेश गुलवाडे,प्रकाश धारणे,निलेश खरबडे,पो नी एस एस भगत,चं श्र प संघ सचिव प्रशांत विघ्नेश्वर,बल्लारपूर भाजप अध्यक्ष काशीसिंह,राजू गुंडेट्टी,छगन जुलमे,आशिष देवतळे,सचिन उमरे,मनीष पोळशेट्टीवार,देवा वाटकर ,रामकुमार आकापेलिवार यांची प्रमुख्याने उपस्थिती होती.

भारतीय जनता पार्टी चंद्रपुर ने कोरोना संकटात समोर येऊन जनतेची सेवा करणाऱ्या योद्ध्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे धोरण आखले.लोकनेते आ.मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात उपक्रमाला सुरवात झाल्यानंतर ,या युद्धातील लढवईय्ये डॉक्टर्स, नर्स, पोलीस व पत्रकार यांना सर्व स्यानिटायझर उपलब्ध करून देण्यात आले.दुसऱ्या टप्यात

पोलिसांना जेवणाचे डबे तर डॉक्टर्स व नर्स साठी पी पी इ किट आम.मुनगंटीवार यांनी उपलब्ध करून दिली.तिसऱ्या टप्यात आता सर्व पोलिसांची आरोग्य तपासणी करण्याचे दिशा निर्देश आ.मुनगंटीवार यांनी दिल्यावर सर्व भाजप कार्यकर्ते कामाला लागले असून आज हा उपक्रम बल्लारपूर येथे राबविण्यात आला

तज्ञ डॉक्टर्स तर्फे किमान ११० पोलीस बंधूंची शुगर,रक्तदाब व थर्मल टेस्ट करण्यात आली.यात डॉ गुलवाडे यांचे नेतृत्वात डॉ डांगे मॅडम आणि लॅब टेक्निशियन प्रवीण चंदनखेडे यानी महत्वाची भूमिका बजावली.अनेकांना रक्तदाब व शुगरची समस्या जाणावल्याने त्याना पुढील उपचारसाठी मार्गदर्शन करण्यात आले.हा अहवाल आता पोलीस अधीक्षकांना पाठविण्यात येणार असल्याचे पो.नी. भगत यांनी संगीतले

.पोलीस अधिकारी धर्मेंद्र जोशी यांनी आभार मानले.पो.अधिकारी प्राची राजूरकर,विनीत धागे,विकास गायकवाड, महादू गोंडके आणि चांदोरे यांनी सहकार्य केले. भाजपाच्या या उपक्रमामुळे चंद्रपुर जिल्हा भजपा कोरोना योद्ध्यांच्या मदतीला धावत आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

Advertisements
error: Content is protected !!