April 18, 2021

Maharashtra Metro

online news portal

जागतिक परिचरिक दिनानिमित्य स्यानिटायझर व मास्क चे वितरण

 

लोकनेते आम मुनगंटीवार यांचा तो उपक्रम सुरूच

कोरोना विषाणू जिल्ह्यात पाय पसरू नये म्हणून लोकनेते आम सुधीर मुनगंटीवार यांनी नागरिकांची वर्दळ असणाऱ्या स्थळी व नागरिकांना सिनेटाझर वितरणचा उपक्रम हाती घेतला.तो आजही सुरू आहे.आज मंगळवार (१२ मे)ला जागतिक परिचारिका दिनाचें औचित्य साधून जिल्हा सामान्य रुग्णालयातील आरोग्य सेवकांना सयानेटायझर व मास्क चे वितरण करण्यात आले.

यावेळी उपमहापौर राहुल पावडे,भाजयुमो जिल्हाध्यक्ष ब्रिजभूषण पाझारे, जिल्हाशल्यचिकित्सक डॉ निवृत्ती राठोड,आय .आर. सी एस चे सचिव डॉ मंगेश गुलवाडे,.संघ सचिव प्रशांत विघ्नेश्वर,सूरज पेदुलवार,प्रज्वलन्त कडू,रामकुमार आकापेलीवार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती

लोकनेते आम मुनगंटीवार यांनी कोरोनाच्या संकटात समाजातील प्रत्येकवर्गाला मदतीचा हात दिला आहे.स्वच्छतेसाठी सिनेटाझर असो की जिल्ह्यात व जिल्हाबाहेर अडकलेले विद्यार्थी,सर्वांना मदत दिली जात आहे. आरोग्य सेवेत असलेल्या परिचारिका व प्रशिक्षणार्थी यांची कोरोनात महत्वाची भूमिका लक्षात घेता त्याना आज स्यानेटाझर व मास्क देण्यात आले यावेळी सर्व मान्यवरांनी फ्लोरेन्स नाईटअंगल

या जगप्रसिद्ध सेवा व्रती परिचरिकेच्या २००व्या जन्मदिन निमित्य त्यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून आदरांजली वाहिली.
यावेळी उपमहापौर पावडे म्हणाले,कोरोनाच्या संकटात परिचरिकाची भूमिका महत्त्वाची आहे.सर्वात पहिले रुग्णांना हेच भेटतात.जीवाची व परिवाराची चिंता न करता ते कर्तव्य बजावत आहेत.या योद्धांचे आरोग्य सुरक्षित रहावे म्हणून ही खटाटोप आहे.या पूर्वी आम मुनगंटीवार यांनी डॉ व परिचरिकेच्या सुरक्षिततेसाठी २५० पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेन्ट (पी पी इ ) किट उपलब्ध करून दिल्या.अशी माहिती देत त्यानी सर्वतोपरी सहकार्य देण्याचे आश्वासन दिले

Advertisements

ब्रिजभूषण पाझारे म्हणाले,डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील दुवा म्हणून परीचारिकेची भूमिका असते,कर्तव्यदक्षतेमुळे रुग्ण बरा होतो,घरचा पाहुणा समजून ही सेवा परिचारिका करतात.कोरोनाचे हे युध्द आपण जिंकू.मानवसेवेचं सर्वोत्तम मध्यम नर्सिंगसेवा होय असे ते म्हणाले.

यावेळी नगरसेवक कासंगोट्टूवार, डॉ गुलवाडे,डॉ राठोड,प्राचार्य मेघा कुळसंगे, यानी मनोगत व्यक्त केले.
स्यानेटाझर व मास्क वितरण प्रसंगी अधिसेविका माया आत्राम,प्रशिक्षणार्थी निकिता लाभाने, समीक्षा कावरे,पल्लवी पुट्टेवार,मानसी मेश्राम,रिंकू कोसांशीले, हर्षा बोरकर,कागल पोटे,लीला टिकरे यांची उपस्थिती होती.मान्यवरांच्या हस्ते स्यानेटाझर ,मास्क व डेटॉल साबण वितरण करण्यात आले.

Advertisements
error: Content is protected !!