April 22, 2021

Maharashtra Metro

online news portal

गतीमान पोलीसींगसाठी चंद्रपुर पोलीसांकडुन डायल १०० यंत्रणा कार्यान्वीत नगरीकांना जलद प्रतिसाद देण्याकरीता महत्वपूर्ण पाउल

नागरिकांकडुन येणाऱ्या तक्रारींना जलद प्रतिसाद देणे हे पोलीसांचे आद्य कर्तव्य आहे. पोलीस नियंत्रण कक्ष येथे १०० या दुरध्वनी क्रमांकावर नागरीकांच्या तक्रारी प्राप्त होतात. या तक्रारीवर तात्काळ कार्यवाही होण्याकरीता पोलीस घटनाठिकाणी पोहचणे आवश्यक असते. चंद्रपुर पोलीस दलात डायल १०० ही यंत्रणा आजपासुन नागरीकांच्या जलद प्रतिसादाकरीता कार्यान्वीत करण्यात आली असुन सद्याचे महत्वपूर्ण स्थितीमध्ये आज दिनांक १२/०५/२०२० रोजी जिल्हयाचे पालकमंत्री मा.ना.श्री. विजय वडेटटीवार, चंद्रपुर यांचे शुभ हस्ते व पोलीस अधीक्षक यांचे उपस्थित (सोशल डिस्टन्सींग पाळुन) उद्घाटन करण्यात आलेले आहे.

 

चंद्रपुर पोलीस नियत्रण कक्षामध्ये डायल 200 ही यंत्रणा सुरू करण्यासाठी मागील आर्थिक वर्षात जिल्हा नियोजन समितीकडून निधीची उपलब्धतता करण्यात आली. जेव्हा कोणत्याही नागरीकांस किंवा महीलांना पोलीसाची तात्काळ मदत हवी असल्यास, तसेच घटनेची माहीती देणे असल्यास पोलीस नियत्रंण कक्ष येथील १०० कमांकावर कॉल केल्यास नियंत्रण कक्षातुन कॉल केलेल्या व्यक्तीच्या जवळपास असलेल्या पोलीस बिट मार्शल यांना कॉल देवुन तात्काळ प्राप्त कॉलवर आलेल्या तक्रारीवर कार्यवाही करण्यात येईल,

डायल १०० ही यंत्रणा सुरू करण्यासाठी आवश्यक असणारी व्हेईकल ट्रेकींग सिस्टम(जीपीएस) जिल्हयातील सर्व पोलीस वाहनांना यापुर्वीच बसविण्यात आली आहे. डायल १०० या सिस्टममुळे पोलीसांना तक्रारीचे ठिकाणी पोहचण्यासाठी एक मर्यादीत प्रतिसाद वेळ देण्यात येईल, सदर १०० हा क्रमाक नागरीकांना व्यस्त असल्याची अडचण येणार नाही, सतत २४ तास १०० क्रमाक कार्यरत राहणार आहे. या सिस्टिममुळे नागरीकांकडुन येणान्या तक्रारीवर तात्काळ कार्यवाही करणे सोईचे होणार असल्याने नियंत्रण कक्ष व पोलीस स्टेशन यामधील समन्वय आणखी चांगला राहणार आहे.

 

सद्याची परीस्थीती ही सर्व जनतेसाठी खप अडचणीची असन कोणालाही पोलीसांच्या मदतीची केव्हाही आवशक्यता भासू शकते, करीता नागरीकांना अत्यावश्यक कारणाकरीता पोलीसांची मदत आवश्यक असल्यास त्यांनी १०० क्रमांकावर कॉल करून मदत घेण्याचे आवाहन चंद्रपुर पोलीस अधीक्षक डॉ .

Advertisements

महेश्वर रेडडी यांनी केले आहे. सदर डायल १०० यंत्रणेचे काम क्रीसर डिजीबॉट्स इंडिया प्रा.लि.पुणे यांनी पुर्ण केले आहे. आताच्या कठीण परीस्थीतीतही चंद्रपुर पोलीसांकडून सुरु झालेली डायल१०० काळामध्ये नागरिकांच्या नक्कीच उपयोगी येणार आहे. यंत्रणा येणारे

Advertisements
error: Content is protected !!