April 22, 2021

Maharashtra Metro

online news portal

तेलंगणावरून आलेले जिल्ह्यातील बांधव पोहोचले आपापल्या गावी झाले रवाना!

चंद्रपूर : आज रविवार दि. १० मे रोजी दुपार ला जवळपास एक वाजता च्या दरम्यान तेलंगणावरून काही जिल्हावासीय चंद्रपूर ला पोहोचले. चंद्रपूरातील मूल, सावली, सिंदेवाही, नागभीड या ठिकाणचे हे बांधव तेलंगणामध्ये एका कंपनीमध्ये काम करत होते. लाॅकडाऊन नंतर लागलेल्या संचारबंदी मुळे हे बांधव त्या ठिकाणी अडकून पडले होते. आज ते ज्याठिकाणी कार्यरत होते, त्या कंपनीच्या खाजगी गाड्यांनी चंद्रपूरच्या बसस्थानक येथे त्यांना आणून सोडले. चंद्रपूरचे तहसीलदार अन्य शासकीय कर्मचाऱ्यांनी त्यांची नोंद करून त्यांना जिल्ह्यातील ज्या ठिकाणचे ते रहिवासी होते त्या-त्या ठिकाणी त्यांना सोडण्याची व्यवस्था करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार एकंदर 124 जणांना त्यांच्या गावी सोडण्यात आले.

महत्वाचे म्हणजे चंद्रपूर वरून त्यांना सोडण्यापूर्वी नागपूर रोडवरील एका लॉन मध्ये त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली त्यानंतर त्यांना त्यांच्या गावी सोडण्याची व्यवस्था करण्यात आली. भारतीय जनता पार्टीचे भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष ब्रिजभूषण पाझारे व चंद्रपूर मनपाचे स्थायी समितीचे अध्यक्ष राहुल पावडे यांच्या उपस्थितीत 2 खाजगी गाड्यांमध्ये आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी डीएनआर या खाजगी कंपनीच्या ट्रॅव्हल्स द्वारे चंद्रपुरात आलेल्यांना सोडण्याची व्यवस्था केली होती. तर काँग्रेसचे प्रकाश देवतळे, नंदू नागरकर, शिवा राव, राजेश अड्डूर यांच्या उपस्थितीत महामंडळाच्या बस मध्ये 26 लोकांना त्यांच्या स्व-गावी सोडण्यात आले. सोमवार दिनांक 11 में पासून जिल्हा अंतर्गत प्रवास करण्यासाठी बसेस सुटणार असून जिल्हाधिकारी महोदय यांच्या देशांनी शिथिलता देण्यात आली आहे, शिथीलतेदरम्यान संचारबंदी च्या नियमाचे पूर्ण पालन करण्याचे आव्हान यापूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

Advertisements
error: Content is protected !!