चंद्रपूर जिल्हयात जीवनावश्यक वस्तुंची विक्री व भाजी विक्रीकरिता सकाळी 7 ते 2 वाजेपर्यंत वेळ नेमून देण्यात आली आहे. इतर व्यवसायांना सुध्दा विशिष्ट वेळ नेमून देण्यात यावी व व्यवहार सुरळीत करावे, अशी मागणी भारतीय जनता पार्टीतर्फे जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच्याकडे करण्यात आली आहे.
आज भाजपाचे जिल्हाध्यक्ष तथा बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरीश शर्मा, चंद्रपूरच्या महापौर सौ. राखी कंचर्लावार, उपमहापौर राहूल पावडे यांनी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांची भेट घेत सदर मागणी त्यांच्यासमोर मांडली. माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांना जिल्हयातील विविध शहरातील व्यापारी मंडळांनी जीवनावश्यक वस्तु व्यतिरिक्त मोबाईल शॉप, स्टेशनरी, रेडीमेड गारमेंट आदी व्यवसायांशी संबंधित व्यवहार सुध्दा सुरळीत करावे अशी मागणी केली
आहे. हे करताना सोशल डिस्टन्सिंग काटेकोरपणे पाळावे , सॅनिटायझेशन , मास्क याबाबत सुद्धा खबरदारी घ्यावी अशी मागणी करण्यात आली.सदर मागणीच्या अनुषंगाने आ. मुनगंटीवार यांच्या सूचनेनुसार भाजपाचे शिष्टमंडळ जिल्हाधिका-यांना भेटले व जिल्हाधिका-यांशी चर्चा केली. येत्या सोमवार पासून काही विशिष्ट दिवस व वेळ नेमून सर्वच व्यवसायांशी संबंधित दुकाने उघडून व्यवहार सुरळीत करण्यात येईल, असे आश्वासन जिल्हाधिका-यांनी शिष्टमंडळाला दिले.
More Stories
मोबाईल बघताना युवकाचा मृत्यू
आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या विकासाच्या झंझावाताचे यश बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात ग्राम पंचायत निवडणूकीत भाजपाला लक्षणीय यश
आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या विकासाच्या झंझावाताचे यश बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात ग्राम पंचायत निवडणूकीत भाजपाला लक्षणीय यश