April 22, 2021

Maharashtra Metro

online news portal

अफवा पसरविणाऱ्या वेब न्युज पोर्टलवर कायदेशिर कारवाई

अशाप्रकारे कुत्य करणाऱ्यांविरुष्द कायदेशिर कारवाईचे पोलीस अधीक्षक यांचे निर्देश

दिनांक ०६मे २०२० रोजी रात्री दरम्यान माणिकगड (गडचांदुर) जिल्हा चंद्रपुर येथे नांदेड येथुन आलेल्या तिन नागरीकांना संशयावरुन जिल्हा प्रशासन व पोलीसांचे मदतीने ताब्यात घेतले होते. पोलीस विभाग व कोव्हीड १९ नियंत्रण कक्षच्या मदतीने नांदेड येथील जिल्हाधिकारी कार्यालय व पोलीसांसोबत सपंर्क केला असता चंद्रपुर येथील ताब्यात घेतलेले तिन इसमांचे नांवे ही नांदेड येथुन पसार झालेल्या इसमांसोबत मिळतेजळते नसल्याची माहीती मिळाली. पुढील खबरदारी म्हणून नांदेड येथील पथक तिनही नागरीकांना घेवुन पुढील तपासणी व पडताळणीकामी नांदेड येथे रवाना झाले. या घटनेची कोणतीही सत्यता न पडताळता जनतेमध्ये संभ्रम व भिती निर्माण होईल अशापध्दतीने चंद्रपूर

येथील खबरकट्टा या वेब न्युज पोर्टल वर काल दिनांक:०७ मे २०२० रोजी दुपारी दरम्यान ‘आताची ब्रेकींग न्युज: चंद्रपुरात सापडले तिन कोरोना पॉझीटीव्ह’ या मथळयाखाली बातमी प्रसारीत करण्यात आली. या बातमीमुळे चंद्रपुर येथील जनतेमध्ये व प्रसारमाध्यमांध्ये अफवा पसरुन एकप्रकारे संभ्रमाचे व भितीचे वातावरण निर्माण झाले. कोवीड १९ च्या सदंर्भात अशाप्रकारे चुकीच्या बातम्या/अफवा पसरवू नये या करीता शासनाने यापुर्वी वेळोवेळी आदेश निर्गमित केलेले आहेत. तसेच चंद्रपुर पोलीस विभागाने सुध्दा याबाबत वेळोवेळी आवाहन केलेले आहे.

खबरकट्टा वेब न्यूज पोर्टल वर प्रसारीत करण्यात आलेल्या या चुकीच्या बातमी करिता पोलीस स्टेशन राजुरा येथे अपराध क्र.२८५/२०२० कलम १८८,५०५(१)(ब),५०५(२)भादंवि सह कलम ५२,५४ आपत्ती व्यवस्थापन अधिनीयम अन्वये सबंधित न्यूज पोर्टलचे सपादक यांचेविरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला असुन कायदेशिर कारवाई करण्यात येत असुन पुढील तपास राजुरा पोलीस करीत आहेत,

सर्व नागरीकांना तसेच प्रसार माध्यमांना पोलीस अधीक्षक, चंद्रपुर यांचेकडुन निर्देशित करण्यात येत आहे की, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. त्याचप्रमाणे जनतेमध्ये संभ्रम व भिती निर्माण होईल अशाप्रकारे संदेश किंवा माहीती खात्री झाल्याशिवाय प्रसारीत करु नये, असे आढळुन आल्यास किंवा तक्रार प्राप्त झाल्यास कायेदशिर कारवाई करण्याचे आदेश सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना पोलीस अधीक्षक चंद्रपुर यांनी निर्गमित केले आहेत.

Advertisements
Advertisements
error: Content is protected !!