चंद्रपूर, दि.7 मे: कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी देशव्यापी लॉकडाऊन करण्यात आले आहे. लॉकडाऊनच्या काळामध्ये सामाजिक माध्यमांवर (सोशल मीडिया) चुकीचे संदेश अथवा अफवा पसरविल्या जात आहे. अशा अफवा पसरविणाऱ्या नागरिकांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश पोलीस प्रशासनाला जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी दिले आहेत.
कोरोना विषाणूच्या संदर्भात वेबपोर्टलवर अनधिकृतपणे बातम्या प्रसारित करून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केल्या जात असल्याचे निदर्शनास येत आहे. जिल्ह्यातील अनेक सामाजिक माध्यमांवर (सोशल मीडिया) 2 दिवसांपूर्वी एका अज्ञात वेबपोर्टलकडून जिल्ह्यात 14 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असे वृत्त प्रसारित करण्यात येत होते. त्याहीपूर्वी एका रुग्णाचा अहवाल फेसबुक, व्हाट्सएप, ट्विटर पर अपलोड करण्यात आला. असे अनेक चुकीच्या बातम्या पोर्टलवरही झळकत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. तसेच शासनाची प्रतिमा मलीन करण्याचा उद्देश या बातम्यातून दिसून माणिकगड (गडचांदूर) येथून ताब्यात घेतलेल्या 3 नागरिकांची नांदेड प्रशासनाकडून पुढील पडताळणी होणार आहे. खबरदारी म्हणून नांदेड येथील पथक अॅम्बुलन्स सह चंद्रपूर येथे येऊन ताब्यात घेतलेल्या तीनही नागरिकांना तपासणी व पडताळणीसाठी नांदेड येथे रवाना केले आहे, अशी माहिती पोलीस अधिक्षक कार्यालयामार्फत मिळाली आहे. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवु नये. जनतेमध्ये भीती निर्माण होईल असे संदेश किंवा माहिती विशेषतः कोरोना आजारा संदर्भातील सर्व वृत्त जिल्हा प्रशासनाकडून दिल्याशिवाय माध्यमांनी देऊ नये तसेच सोशल मीडियावर प्रसारित करू नये असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
यासंदर्भात काही वादग्रस्त पोर्टल व चुकीच्या बातम्या देणाऱ्या संकेतस्थळावर सायबर विभागाने लक्ष वेधावे व दोषी आढळल्यास कडक कारवाई करावी असे स्पष्ट केले आहे.
व्हॉट्सअॅपवर अफवा पसरविणारे चुकीचे मेसेजेस, फोटोज, व्हिडिओज, पोस्ट्स पाठवून व महामारीला धार्मिक रंग देऊन समाजात अशांतता पसरवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या पोस्ट्स सारासार विचार न करता फॉरवर्ड केल्यास अॅडमीनसह अशा सर्वांवर शासनाच्या प्रचलित विविध कायद्यानुसार गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.
More Stories
जिल्ह्यात डॉ. भास्कर सोनारकर यांना सर्वप्रथम कोविशिल्ड लसीचा डोज
वाहनांचा अपघात करणार्या चालकांना अभयदान – न्यायाधिककाऱ्यांचा अजब निवाडा
अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूकीवर प्रशासनाची धडक कारवाई