April 22, 2021

Maharashtra Metro

online news portal

गडचिरोलीत पीएसआयच्या पत्नीची गोळी झाडून आत्महत्या

गडचिरोली जिल्ह्यातील एका पोलिस उपनिरीक्षकाच्या पत्नीने स्वतः च्याच डोक्यात रिव्हॉल्वरने गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

गडचिरोलीतील उपविभाग अहेरी अंतर्गत येणाऱ्या पोलिस स्टेशन मूलचेरा येथे पोलिस उपनिरीक्षक धनराज शिरसाठ कार्यरत आहेत. धनराज हे त्यांची पत्नी संगीता (वय २८), दोन मुले भार्गर्वी (९) आणि शुभम (४) आणि आई-वडील यांच्या सोबत वास्तव्यास होते. पोलिस उपनिरीक्षक धनराज शिरसाट हे नक्षलविरोधी अभियान राबवून आज, गुरूवारी (दि. ७) पोमके मूलचेरा येथे परतले होते. त्यानंतर ते त्यांचे आई-वडीलांसह मौजा मूलचेरा येथे कामानिमित्त गेले होते.
यावेळी त्यांची पत्नी संगीता व दोन मुले घरीच होती.

आज (दि. ७) दुपारी १२.३० ते १ वाजण्याच्या दरम्यान संगीता शिरसाट यांनी राहत्या घरात स्वतःवर डोक्यात गोळी मारून घेतली. यावेळी गोळी झाडल्याचा आवाज ऐकून व आईने स्वतःवर गोळी मारून घेतल्याचे पाहून भार्गवीने आरडाआरोड केला. त्यावेळी पोमके येथे तैनातीस असलेले कर्मचारी व अधिकारी घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी त्यांनी संगीता यांना जखमी अवस्थेत पाहिले. यानंतर त्यांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर येथे नेण्यात आले असताना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.

या घटनेची आकस्मिक मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास गडचिरोली पोलिस दल करत आहे.

Advertisements
Advertisements
error: Content is protected !!