माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने चंद्रपूर शहरातील रय्यतवारी कॉलरी परिसरातील रहिवासी असलेल्या सुनिल कुलगुरवार या कॅन्सर पिडीत व्यक्तीला व त्यांच्या कुटूंबियांना आर्थिक मदत करण्यात आली. भाजपाचे युवा पदाधिकारी सुरज पेदुलवार व प्रज्वलंत कडू यांनी सुनिल कुलगुरवार यांची अडचण आ. मुनगंटीवार यांच्या कानावर घातली. आ. मुनगंटीवार यांनी त्वरीत दखल घेत त्यांना आर्थीक मदत केली व त्यांना जीवनावश्यक वस्तुंची किट सुध्दा दिली.
सुनिल कुलगुरवार कॅन्सरने आजारी असून तयांची पत्नी घरकाम करून कुटूंबाचा उदरनिर्वाह चालविते. सुनिल कुलगुरवार यांचे चहाचे छोटे दुकान होते. मात्र लॉकडाऊनमुळे या परिवाराला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे व उपचारासाठी सुध्दा हाती पैसे नसल्यामुळे आ. मुनगंटीवार यांनी केलेली मदत आपल्यासाठी लाख मोलाची असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. सुरज पेदुलवार व प्रज्वलंत कडू यांचे सुध्दा कुलगुरवार कुटूंबियांनी आभार व्यक्त केले आहे.
Good job Sudhir bhau