April 23, 2021

Maharashtra Metro

online news portal

बरांज तांडा येथील हातभट्टी वर पोलिसांची मोठी कारवाई ? चार लाख पन्नास हजाराचा मुद्देमाल जप्त, चार आरोपी अटकेत!

भद्रावती – तालुक्यातील बरांज तांडा येथील हातभट्टीच्या दोन वेगवेगळ्या कारवाईत चार आरोपींना अटक करण्यात आली असून हात भट्टी दारूसह चार लाख पन्नास हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, ही कारवाई काल मंगळवार ला करण्यात आली

यातील पहिल्या कारवाईत देविदास रामजी चौधरी ,सुरज राजू लावडीया, राहणार बरांज तांडा तर दुसऱ्या कारवाईत सुरज पारखी ,अक्षय निखाडे राहणार वरोरा. अशी आरोपींची नावे आहे गुन्हे अन्वेषण विभाग प्रमुख अमोल तुळजेवार यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार बरांजतांडा येथील झुडपी जंगलात गुळाची दारू काढीत असताना पोलिसांनी दोन आरोपी सह येथील मुद्देमाल जप्त केला

तर दुसऱ्या कारवाईत मानोरा फाट्याजवळ बरांज तांडा येथील दारू दुचाकी वाहनाने नेत असताना दोन आरोपींना अटक करण्यात आली त्यांचेकडून 450000 असा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई ठाणेदार सुनील सिंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनी अमोल तुळजेवार सचिन गुरनुले . हेमराज प्रधान .केशव चिटगिरे ,शशांक बद्दमवार यांनी ही कारवाई केली .

Advertisements
error: Content is protected !!