April 22, 2021

Maharashtra Metro

online news portal

बिबी येथील उपसरपंचावर बदनामकारक वक्तव्य केल्याने गुन्हा दाखल..भा.द.वि.संहिता कलम ५०० नुसार कारवाई

 

बिबी गावात एका महिलेला रेशन मिळाले नसून उपासमार करण्याची वेळ आली या आशयाची बातमी प्रकाशित झाली होती. ही बातमी खोटी असल्याचा दावा उपसरपंच आशिष देरकर यांनी केला आणि बातमी देणारे पत्रकार हबीब शेख यांच्यावर अत्यंत असंस्कृत शब्दांत टिका-टिप्पणी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून त्यांनी केली. या घटनेने व्यथित झालेल्या हबीब शेख यांनी त्या महिलेसंदर्भात सर्व कागदपत्र व माहिती गोळा करून सदर बातमी खरी असल्याचे लोकांना पटवून दिले.

त्यानंतर आपली अकारण उपसरपंच आशिष देरकर यांनी बदनामी केली असल्याचे त्यांनी मांडले. महिलेचे बँक स्टेटमेंट, घराचे विजबिल, घराचे फोटो, व्हिडीओज, ऑनलाइन रेशन साईटला त्या महिलेच्या नावावर रेशन कार्ड नसणे अशा अनेक मुद्द्यांवर कागदपत्रांसहित आपण दिलेली बातमी खरी असल्याचे हबीब शेख यांनी मांडले. त्या बातमीने सदर महिलेला प्रशासनाने मदत पोहचवली आहे. तर हे सर्व पुरावे सादर करत एका प्रामाणिक पत्रकाराची आशिष देरकर यांनी बदनामी केली असे म्हणत गडचांदूर पोलीस स्टेशनला धाव घेतली अखेर त्या तक्रारीची संपूर्ण चाचपणी केल्यानंतर पोलीसांनी बिबी येथील उपसरपंच देरकर यांचेविरोधात

भारतीय दंड विधान संहितेतील कलम ५०० अंतर्गत गुन्हा नोंदवीला आहे. गडचांदूर पोलीस स्टेशनने ही कारवाई केली. काही दिवसांपूर्वी बिबी येथील रेशन घोळ समोर आला. जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी त्याबाबत बिबी येथिल रेशन दुकानाचा परवाना निलंबित केला आहे. त्यानंतर आशिष देरकर यांनी बिबी येथील इलेक्ट्रॉनिक चॅनेलचे पत्रकार हबीब शेख यांच्याविरोधात सोशल मिडियावर अनेक विधान केले. हे विधान बदनामी करणारे असल्याने अखेर देरकर यांचेविरोधात एन.सी.आर. दाखल झाला.

 

पत्रकारितेचे पावित्र्य जपले पाहिजे. मी नेहमी सत्याची बाजू मांडली आणि सक्षमपणे गावातील लोकांच्या समस्येला वाचा फोडली. ‘मी’पणाची भावना व झालेली चूक मान्य न करण्याचा असलेला स्वभाव यामुळे माझ्यावर खरी बातमी देऊन देखील जिल्हा स्मार्ट ग्राम उपसरपंच देरकर यांनी विकृतीदर्शक बदनामी केली. अत्यंत नीच शब्दात माझ्यावर वार केल्याने

Advertisements

माझे कुटुंबीय , आप्तस्नेही आणि ग्रामस्थ व्यथित झाले. बिबी गावातील लोक माझ्यासोबत उभे राहिले म्हणून एक सर्वसामान्य शेतकरी आज कायदेशीर लढाई लढत असल्याचे मत हबीब शेख यांनी व्यक्त केले. शेती, माती, संस्कृतीशी आपली नाळ कट्टीबद्ध असून गावाच्या हितासाठी पत्रकारिता करत राहील असेही ते म्हणाले.

तर, गडचांदूर पोलीस स्टेशनने या प्रकरणात आशिष देरकर यांच्याविरोधात गुन्हा नोंदवत न्यायालयात दाद मागण्याचा सल्ला दिला आहे.

Advertisements
error: Content is protected !!