घरपोच डिलीवरी नावाखाली फसवणुकीची जाहीरात…
कोरोना विषाणुमुळे सुरु असलेल्या लॉकडाऊन दरम्यान सर्व नागरीकांना यांना विनाकारण घराबाहेर न पडण्याचे प्रशासनाचे आदेश आहे. नागरीक हे आपआपल्या घरात बसुन इंटरनेटच्या माध्यमातुन सोशल मिडीयाचा मोठया प्रमाणामध्ये वापर करीत असुन इतरही ऑनलाईन सेवा घेत आहेत. परंतू इंटरनेटच्या माध्यमातुन काही ठगवा / फसवणुक करणारे इसम सोशल मिडीयाचा दुरुपयोग करुन आर्थिक फसवणुक करीत असल्याचे पोलीस विभागाचे निर्दशनास आले आहे..
मागील काही दिवसापासुन फेसबुक या सोशल मिडीयावर call me home delivery अशा प्रकारे जाहिरात देवून त्याठिकाणी दारुच्या बॉटलचे फोटो व मो.क्र.९१०११९८०७८,९७८३९४०७६८,९९८२८५२९६४ अशाप्रकारे नमुद केलेले आहेत. पोलीसांनी या क्रमाकांची प्राथमिक स्तरावर पडताळणी केलेली असता,
सदर क्रमाक हे बाहेरील राज्यातील असुन बाहेरील राज्यातुन ऑपरेट होत असल्याचे आढळुन आले आहे. चंद्रपुर जिल्हयामध्ये अशाप्रकारे होम डिलीवरी कोणतीही शक्यता नाही. उलट तुमची फसवणुकचीच दाट शक्यता आहे. आपण ग्राहक म्हणुन या क्रमाकावर फोन केल्यास आपणास काही पैसे सुरवातीला दयावे लागतील व उर्वरीत पैसे डिलीवरी झाल्यानंतर, असे सांगण्यात येते.
परंतू हे सर्व बनावट असल्याचे प्राथमिक चौकशीमध्ये आढळून आललेले आहे. तरी सर्व नागरीकांना असे आवाहन करण्यात येत आहे की, सोशल मिडीयावरील अशाप्रकारच्या फसव्या जाहीरातवर कोणत्याहीप्रकारे विश्वास ठेवू नये. खात्री पटल्याशिवाय ऑनलाईन पेमेंट करुन नये, तसेच मोबाईल फोनवर कोणत्याही अनोळखी व्यक्तीस आपल्या बँक अकाउटचे डिटेल शेअर करु नये. अशाप्रकारे ऑनलाईन फॉड/काल पासुन सावध रहावे, असे आवाहन चंद्रपुर पोलीसांकडुन करण्यात येत आहे.
More Stories
जिल्ह्यात डॉ. भास्कर सोनारकर यांना सर्वप्रथम कोविशिल्ड लसीचा डोज
वाहनांचा अपघात करणार्या चालकांना अभयदान – न्यायाधिककाऱ्यांचा अजब निवाडा
अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूकीवर प्रशासनाची धडक कारवाई