April 22, 2021

Maharashtra Metro

online news portal

पोलीस स्टेशन पडोली येथे रक्तदान शिबीराचे आयोजन पोलीस व परीसरातील युवकांचा उस्फुर्त सहभाग

कोरोना विषाणुमुळे सुरु असलेल्या लॉकडाउन दरम्यान रुग्णालयांना रक्ताच्या कमतरतेची अडचण भासत आहे. पोलीस स्टेशन पडोली येथील प्रभारी अधिकारी व कर्मचारी यांनी आपले दैनंदिन कर्तव्य बजावित असतानाच ही अडचण सोडविण्यासाठी पुढाकार घेवुन पोलीस अधीक्षक चंद्रपुर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन पडोली अतंर्गत लोकसेवा मंगलकार्यालय, पडोली येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले.

सदर शिबीरामध्ये सहभाग घेतलेल्या नागरीकांना आज रोजी पोलीस स्टेशन पडोली यांचे वतीने मास्कचे सुध्दा वाटप करण्यात आले.

आज दिनांक ०५ मे २०२० रोजी आयोजीत रक्तदान शिबीरामध्ये पोलीस अधिकारी कर्मचारी व परीसरातील गावामधील युवकांनी उस्फुत सहभाग घेवुन एकुण १३९ नागरीक व पोलीसांनी रक्तदान केले. सदर रक्तदान शिबीर आयोजीत करण्याकरीता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, चंद्रपुर येथील डॉ. अमित प्रेमचंद, डॉ. पवार व त्यांचे सहकारी यांनी महत्ववाचे योगदान दिले. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, चंद्रपुर, अपर पोलीस अधीक्षक . प्रशात खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी शिलवंत नांदेडकर, यांनी सुध्दा रक्तदान शिबीरास भेट दिली.पोस्टे प्रभारी सपोनि तुषार चव्हाण, पोस्टे पडोली, पोउपनि सचिन यादव व पोलीस स्टेशन पडोली येथील कर्मचारी यांनी शिबीराचे यशस्वीतेकरीता महत्वाची भुमिका बजावली. सद्यपरीस्थीतीमध्ये पोलीस आपला क्यात घालुन नागरीकांकरीता आपले कर्तव्य बजावीत असताना आयोजित केलेल्या रक्तदान शिबीराबद्दल नागरीकांनी पडोली पोलीसांचे कौतुक केले आहे.

Advertisements
error: Content is protected !!