April 15, 2021

Maharashtra Metro

online news portal

महाराष्ट्रातून 35 हजार मजूर घरी परतले

महाराष्ट्रातून आत्तापर्यंत 35 हजार स्थलांतरित मजुरांना त्यांच्या घरी पोचवण्यात आल्याची माहिती राज्य सरकारच्या एका अधिकाऱ्याने दिली. या मुजरांसाठी विशेष रेल्वे गाड्या सोडण्यास अनुमती देण्यात आल्यानंतर हे मजूर टप्प्याटप्प्याने त्यांच्या राज्यात पाठवण्यात आले आहेत. या अधिकाऱ्याने सांगितले की, यातील प्रत्येक मजुराची वैद्यकीय तपासणी करूनच त्यांना त्यांच्या राज्यात परत पाठवले जात आहे.

महाराष्ट्रात अनेक राज्यातील मजूर कामाला आहेत. सुमारे पाच लाख मजूर ठिकठिकाणी अडकून पडले आहेत. त्यांची माहिती घेऊन संबंधित राज्यांशी सल्लामसत करून त्यांना त्यांच्या राज्यात पाठवण्याचे प्रयत्न केले जात आहेत.

या मजुरांची आरोग्य चाचणी केली जात नसली तरी करोनाची लक्षणे दिसत नसलेल्या परंतु करोना झालेल्या रूग्णाला यातून शोधणे शक्‍य नाही. कारण आमच्या चाचण्या या प्राथमिक स्वरूपाच्या आहेत आणि यातील प्रत्येक मजुराची करोना चाचणी घेणे शक्‍य नाही असेही या अधिकाऱ्याने नमूद केले.

रेल्वे शिवाय या मजुरांना बसमधूनही सोडण्याची तयारी दर्शवण्यात आली आहे. पण आत्तापर्यंत राजस्थान वगळता अन्य कोणत्याही राज्याने त्यांच्या बसची सोय करण्याची तयारी दर्शवलेली नाही.

Advertisements
Advertisements
error: Content is protected !!