April 22, 2021

Maharashtra Metro

online news portal

तुमच्या अहंकारासाठी शासनाचा वेळ वाया घालवणार का..?

प्रहारचे सूरज ठाकरे यांचा युवक काँग्रेसला रोखठोक सवाल

युवक काँगसच्या तक्रारीत बिबी येथील रेशन दुकानाचे नाव नाही

लॉकडाऊन काळात बिबी येथील रास्त भाव दुकानात झालेल्या घोळामध्ये युवक काँग्रेसचे आशिष देरकर अडचणीत आले आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी बिबी येथील रेशन दुकान निलंबित झाले आहे. या घटनेनंतर युवक काँग्रेसचे आशिष देरकर भांबावले आहेत की काय? अशी परिस्थिती आहे. मुख्य कारण म्हणजे या आधी सोशल मीडियातून बिबी येथील प्रगतशील शेतकरी हबीब शेख यांच्याविरोधात त्यांनी अनेक आरोप केले होते. या घटनेला प्रत्युत्तर देताना हबीब शेख यांनी कागदपत्रांसहित हे आरोप खोटे असल्याचे म्हटले. तर बिबी येथील निलंबित रेशन दुकान चालवत असलेल्या महालक्ष्मी गटाची अनियमतता समोर आल्यानंतर त्यांच्याविरोधात गुन्हा नोंद व्हावा अशी मागणी देखील नागरिकांत जोर धरू लागली आहे. या गटात युवक काँग्रेसचे देरकर यांच्या पत्नी व मातोश्री यांचा समावेश वादाचा मुद्दा झाला आहे.

आता, या घटनेकडुन लक्ष भरकटवण्यासाठी युवक काँग्रेस सूडबुद्धीचे राजकारण तर करत नाही ना ..? हा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, हा कोरोना संकटकाळ असल्याने एकमेकांना मदत करणे आणि सहकार्याची भावना ठेवणे गरजेचे आहे. आज युवक काँग्रेस महासचिव यांनी तहसीलदारांना निवेदन देत कोरपणा तालुक्यातील सोनुर्ली, सांगोडा, विरुर, उपरवाही, भारोसा, कवठाळा, लखमापूर, धामणगाव,धनकदेवी, कारगाव, मारकागोंदी, नांदा, गडचांदूर आदी गावातील रेशन धान्य दुकानात अनियमतता असल्याची तक्रार दिली आहे. विशेष म्हणजे ‘बिबी’ गावातील घटना तालुकाभर गाजत असताना तक्रारीत ‘बिबी’ येथील स्वस्त धान्य दुकानाचे नाव वगळणे कितपत योग्य?

आणि या प्रकरणात सूडबुद्धीने राजकारण कोण करत आहे हे लोकांना कळत आहे? हे शोधणे गरजेचे आहे. जर कोणत्याही स्वस्त धान्य दुकानात अनियमतता असेल तर कारवाई झालीचं पाहिजे. पण बिबीच्या घोळाविषयी न बोलता तालुक्यातील इतर गावांतील रास्त धान्य दुकानाचे नाव समोर आणणे चुकीचे असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहे. आता, जिल्हा पूरवठा अधिकारी यांनी कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता बिबी येथील रास्त दुकानावर कायदेशीर गुन्हा नोंदवला पाहिजे असे मत प्रहारचे सूरज ठाकरे यांनी व्यक्त केले

विशेष म्हणजे बिबी गावाला जिल्हा स्मार्ट ग्राम घोषित केले आहे. बऱ्याच अटी-शर्थीचे उल्लंघन यात झाले असल्याची शंका आहे. जी लोक स्वतः च्या चोरीवर पांघरून घालत दुसऱ्याकडे बोट दाखवतात ते समाजाचे काय भले करतील? असा खोचक सवाल देखील सूरज ठाकरे यांनी युवक काँग्रेसचे देरकर यांना विचारला आहे.
दरम्यान बिबी गावातील रेशन दुकान चालवणाऱ्या गटावर गुन्हा नोंद होईल का ? याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Advertisements
Advertisements
error: Content is protected !!