जिल्हाधिकारी यांचेमार्फत मा.मुख्यमंत्री व मा.ऊर्जामंत्री यांना निवेदन देऊन केली मागणी
संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना चे मोठे थैमान माजलेले असून सर्वसामान्य जनतेचे, छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांचे, शेतकऱ्यांचे, कामगार व मजुरांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक हाल होताना दिसत आहे. सर्वांचे छोटे-मोठे उद्योग काम-धंदे बंद पडलेले आहेत. मार्च महिन्यापासूनच लाॅकडाऊन असल्याने कोणताही रोजगार नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक चणचण निर्माण झालेली आहे. अशा आर्थिक विवंचनेत सापडलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेला व शेतकऱ्यांना वीज बिल भरायला सुद्धा पैसे नाही आहेत. त्यामुळे शासनाने या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन जिल्ह्यातील लाकडावून काळातील घरगुती विज बिल तसेच शेतकरी व कृषी पंपाचे विजबिल माफ करावे. कोरोनाच्या महाभयंकर संकटकाळात शासनाने शेतकरी व सर्वसामान्य जनतेचे वीजबिल माफ करून सहकार्य करावे.अशी मागणी उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे* यांनी जिल्हाधिकारी चंद्रपूर यांचेमार्फत मा.मुख्यमंत्री व मा.ऊर्जामंत्री, महाराष्ट्र शासन यांच्याकडे निवेदनाच्या मार्फत केलेली आहे.
More Stories
मोबाईल बघताना युवकाचा मृत्यू
आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या विकासाच्या झंझावाताचे यश बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात ग्राम पंचायत निवडणूकीत भाजपाला लक्षणीय यश
आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या विकासाच्या झंझावाताचे यश बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात ग्राम पंचायत निवडणूकीत भाजपाला लक्षणीय यश