April 22, 2021

Maharashtra Metro

online news portal

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या माध्‍यमातुन आरोग्‍य यंत्रणेसाठी आणखी 290 पीपीई किट उपलब्‍ध

माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी खा विकास महात्मे यांच्या सहकार्याने चंद्रपूर जिल्‍हा प्रशासनाला 290 पीपीई किट उपलब्‍ध करून दिल्या असून या माध्‍यमातुन कोरोनाच्‍या विरोधात लढा लढताना सुरू असलेल्‍या सेवाकार्यात भर घातली आहे.  आधीही आ. मुनगंटीवार यांनी 250 पीपीई किट्स जिल्हा प्रशासनाला उपलब्ध केल्या आहेत. लवकरच आणखी 800 पीपीई किट्स आ. मुनगंटीवार यांच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहेत.

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता चंद्रपूर जिल्‍हा प्रशासन व आरोग्‍य विभाग प्रयत्‍नांची शर्थ करीत आहे. आ. सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्‍हयातील प्राथमिक आरोग्‍य केंद्रांना सॅनिटायझर वितरीत केले असून त्‍यांच्‍या माध्‍यमातुन मास्‍क व डेटॉल साबणचे वितरण नागरिकांमध्‍ये केले जात आहे. श्रीराम धान्‍य प्रसाद अर्थात जीवनावश्‍यक वस्‍तुंच्‍या किटस वितरण व गरीब, गरजूंसाठी भोजनाची व्‍यवस्‍था करण्यात आली आहे. रूग्‍णांना त्‍यांच्‍या घरी सुखरूप पोहचविण्‍यासाठी वाहन व्‍यवस्‍था सुध्‍दा रूग्‍णालयांमध्‍ये त्‍यांनी उपलब्‍ध केली आहे.

अशा पध्‍दतीने सुरू असलेल्‍या सेवाकार्यात जिल्‍हा प्रशासनाला पुन्हा 290 पीपीई किट पुरवून त्‍यांनी भर घातली आहे. सदर पीपीई किट जिल्हा प्रशासनाला सुपूर्द करताना महापौर सौ राखी कंचर्लावार,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री राहुल कर्डीले , उपमहापौर राहुल पावडे , जिल्हा परिषद सदस्य ब्रिजभूषण पाझारे , भाजप नेते प्रकाश धारणे आदींची उपस्थिती होती. सोशल डिस्टन्सिंग पाळत पीपीई किट प्रशासनाला सुपूर्द करण्यात आल्या.

Advertisements
error: Content is protected !!