April 18, 2021

Maharashtra Metro

online news portal

कोरोना लाॅकडाऊन काळात संरक्षण सामग्री देऊन डाॅंक्टरांच्या सेवेचा पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्यातर्फे सन्मान करण्यात आला

 

देशात 24 मार्च पासुन लाॅकडाऊन असल्यामुळे प्रधानमंत्र्यांच्या या देशहीताचा निर्णय पाहता नागरीकांसोबतच सर्व यंत्रना आरोग्य विभाग, पोलीस विभाग, नगर प्रशासन, पोलीस फोर्सेस सुरक्षा दल हे फार गांभीर्याने प्रधानमंत्र्यांच्या सुचनेप्रमाणे फार जिम्मेदारीने काम करत आहे.

आजच देशभर देशाचे प्रधानमंत्री मा. नरेंद्र मोदी आणि रक्षामंत्री राजनाथ सिह यांच्या नेतृत्वात सर्व ठीकानी अधिकारी डाॅंक्टर व आरोग्य कर्मचारी यांच्यावर फुलांचा वर्षाव करून त्यांच्या कार्याचा सन्मानाने गौरव करण्यात आला. याच्यातुन प्रेरणा घेऊन आज पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी आरोग्य क्षेत्रातील अधिष्ठाता, जिल्हा शल्य चिकीत्सक, आणि अन्य विभाग प्रमुख या सर्वांचा जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात जाऊन सन्मान करतांना पिपिई कीट आणि फेस मास्क दीले. या भेटवस्तु जे सुरक्षा सामग्री आहे याचे बाॅक्स सुपुर्त करतांना अहीर म्हणाले हा आपल्या सेवेचा सन्मानार्थ तसेच आपल्या बहुमुल्य सेवेने प्रभावित होऊन भेट देत आहोत. भारतीय जनता पक्षाकडुन हे अभियान सर्वत्र सुरू आहे त्यातलाच हा भाग. डाॅंक्टर, आरोग्य कर्मचारी, नर्सेस भगीनी या सर्वांच्याप्रती आदर व्यक्त करतो, ही सुरक्षा सामग्री डाॅ. गंगारामजी अहीर चॅरीटेबल ट्रस्ट यांच्या सौजन्याने सुपुर्त केली. या कोरोना संकटात ही सुरक्षा सामग्री अधिकारी डाॅक्टर जे सेवा देत आहे अशांना ही सामग्री कामी येतील ही भावना व्यक्त केली.

यावेळी अधिष्ठाता डाॅ. मोरे, जिल्हा शल्य चिकीत्सक डाॅ. राठोड, डाॅ एम. जे. खान, डाॅ. सोनारकर, डाॅ. हुमने, उाॅ. सुरपाम, डाॅ. दगडी, विजय राऊत, राहुल घोटेकर, राजु येले, पुनम तिवारी, मोहन चैधरी, राजेश मुन, रघुविर अहीर, महेश अहीर यांची उपस्थिती होती.

Advertisements
error: Content is protected !!