April 18, 2021

Maharashtra Metro

online news portal

चंद्रपूरमध्ये पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण क्रिष्णानगर परिसर सील

चंद्रपूर दि.२ मे : गेल्या महिनाभरापेक्षा अधिक काळ कोरोना निगेटिव्ह असणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये काल शानिवारी सायंकाळी 8:30 वाजता एका रुग्णाचा नमुना पॉझिटिव्ह आला आहे. चंद्रपूर महानगरातील बंगाली कॅम्प परिसरात असणाऱ्या क्रिष्णा नगर भागाला पूर्णतः बंद करण्यात आले आहे.

कोरोना बाधित आढळल्यामूळे ए-मेल प्रभाग क्रमांक 3 मधील कृष्णनगर, केरला काॅलनी, उत्तरेकडील कृष्णनगर एंट्री गेट, दक्षिणेकडील हनुमान टेकडी, पूर्वेकडील रेल्वे पूलिया, पश्‍चिम भागातील नाला याठिकाणी नागरिकांचे हित व सुरक्षेच्या दृष्टीने सील करण्यात आले आहे. या संपूर्ण भागामध्ये 28 ठिकाणी पोलिसांची कडक नाकाबंदी असून जीवनावश्यक वस्तू, वैद्यकीय सेवा वगळता कुणालाही या क्षेत्रात प्रवेश बंद करण्यात आला आहे.

Advertisements
error: Content is protected !!