April 18, 2021

Maharashtra Metro

online news portal

चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयात काम करणाऱ्या बांधकाम मजुरांचा आज उद्रेक पाहायला मिळाला.

 

शेकडोंच्या संख्येने हे मजूर जमून आपल्या स्वगावी निघाले. वेळीच पोलीस प्रशासनाने त्यांची समजूत काढली आणि मोठा अनर्थ टळला.

शहरातील पागल बाबा चौक येथे चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयाचे बांधकाम सुरू आहे. यासाठी छत्तीसगड, मध्यप्रदेश, बिहारचे मजूर शेकडोंच्या संख्येने कामावर होते. अशातच लॉकडाउन झाले आणि हे मजूर येथेच अडकले. या सर्व मजुरांची व्यवस्था करण्याची जबाबदारी कंत्राटदाराची होती. मात्र, त्याने या मजुरांना वाऱ्यावर सोडत पळ काढला. त्यामुळे या मजुरांना दोन वेळचे जेवन मिळणे देखील मुश्किल झाले. हे मजूर मोठ्या हलाकीचे जीवन जगत होते. काल मजुरांसाठी छत्तीसगड साठी ट्रेन धावली असल्याचे या मजुरांच्या लक्षात आले. त्यामुळे मजुरात उद्रेकांची ठिणगी पडली. आम्हीही आता मिळेल त्या साधनाने परत जाऊ असे म्हणत हे मजूर शेकडोंच्या संख्येने रस्त्यावर उतरले. त्यांनी आपल्या गावाकडे प्रस्थानही केले. मात्र, वेळीच पोलीस प्रशासन आणि तहसीलदार यांच्या मध्यस्थीने त्यांची समजूत काढण्यात आली. यावर तोडगा काढण्यासाठी मजुरांचे काही प्रतिनिधी आणि कंत्राटदारांना चर्चेसाठी रामनगर पोलीस ठाण्यात बोलाविण्यात आले आहे. यात जो अंतिम तोडगा निघणार त्यानुसार मजूर निर्णय घेणार आहेत.

Advertisements
error: Content is protected !!