April 22, 2021

Maharashtra Metro

online news portal

चंद्रपूर जिल्हा ग्रीन झोन मध्येच आहे; जिल्हाधिकाऱ्यांचा माहिती

चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आजपर्यंत एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण नाही

नागपूर येथे चंद्रपूर मूळ नागरिक असणारे विदेशातील 2 नागरिक पॉझिटिव्ह आले होते ते नागरिक धोक्याबाहेर असून सध्या नागपूर येथे उपचार घेत आहे. जिल्ह्यामध्ये एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही अद्याप तसा कोणताही अहवाल कोणाचा आलेला नाही राज्य शासनाच्या काही वेबसाईटवर नागपूर मध्ये असलेल्या या रुग्णांचा चंद्रपूर शहराच्या नावावर उल्लेख दाखविण्यात येतो मात्र हा उल्लेख चुकीचा असून चंद्रपूर जिल्हा एकही रुग्ण नसलेला जिल्हा आहे असा खुलासा जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केला आहे.

53 विद्यार्थी कोटावरून परतले राजस्थानमधील कोटा येथे विविध अभ्यासक्रमासाठी अडकून पडलेल्या जिल्ह्यातील 53 विद्यार्थ्यांचे चंद्रपूर शहरांमध्ये आज आगमन झाले. या सर्व विद्यार्थ्यांना पुढील 14 दिवस होम कॉरेन्टाईन करण्यात आले.

राज्य शासनाने कोटा येथे अडकलेल्या सर्व विद्यार्थ्यांना आणण्यासाठी बीड येथून विशेष बसेस सोडल्या होत्या प्रत्येक जिल्ह्याच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या शहरापर्यंत सोडण्यात आले आहे. हे विद्यार्थी देखील शहरात आज पोहोचले आहे.

जिल्ह्यात 1 मे रोजी कोरोना संसर्ग संशयित म्हणून 114 नागरिकांची नोंद करण्यात आली असुन यातील 106 स्वब53 विद्यार्थी कोटावरून परतले राजस्थानमधील कोटा येथे विविध अभ्यासक्रमासाठी अडकून पडलेल्या जिल्ह्यातील 53 विद्यार्थ्यांचे चंद्रपूर शहरांमध्ये आज आगमन झाले. या सर्व विद्यार्थ्यांना पुढील 14 दिवस होम कॉरेन्टाईन करण्यात आले.

Advertisements

राज्य शासनाने कोटा येथे अडकलेल्या सर्व विद्यार्थ्यांना आणण्यासाठी बीड येथून विशेष बसेस सोडल्या होत्या प्रत्येक जिल्ह्याच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या शहरापर्यंत सोडण्यात आले आहे. हे विद्यार्थी देखील शहरात आज पोहोचले आहे.

जिल्ह्यात 1 मे रोजी कोरोना संसर्ग संशयित म्हणून 114 नागरिकांची नोंद करण्यात आली असुन यातील 106 स्वब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी 98 नमुने निगेटिव्ह निघाले आहेत तर 7 नमुन्यांचा अहवाल अप्राप्त आहे.

जिल्ह्यामध्ये आतापर्यंत विदेशातून, राज्याबाहेरून व जिल्हा बाहेरून आलेल्या नागरिकांची संख्या 34 हजार 197 आहे.

यापैकी 2 हजार 258 नागरिक निगराणीखाली आहेत. तर 14 दिवसांच्या होम कॉरेन्टाईन पूर्ण केलेल्या नागरिकांची संख्या 31 हजार 939 आहे. जिल्ह्यामध्ये इन्स्टिट्यूशनल कॉरेन्टाईन करण्यात आलेल्या नागरिकांची संख्या 220 आहे. अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राजकुमार गहलोत यांनी दिली आहे.

संचारबंदीच्या काळात शासन व प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या सुचनांचे पालन न करणाऱ्यांविरुध्द प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारत जिल्ह्यातील 306 प्रकरणात एकूण 16 लाख 33 हजार 570 रुपये दंड वसल करण्यात आला आहे.संचारबंदीच्या काळात शासन व प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या सुचनांचे पालन न करणार्या विरुध्द प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारत जिल्ह्यातील 306 प्रकरणात एकूण 16 लाख 33 हजार 570 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

यामध्ये नियमांचे पालन न करणाऱ्या 58 नागरिकांना अटक करण्यात आली आहे. तर 1047 वाहने जप्त केली आहेत.

Advertisements
error: Content is protected !!