April 22, 2021

Maharashtra Metro

online news portal

त्या रुग्णांसाठी शिक्षकही आले पुढे २९ व्या दिवशी ९ शिक्षकांचे रक्तदान लोकमान्य टिळक कन्या विद्यालयचा पुढाकार

 

आम सुधीरभाऊ मुनगंटीवार मित्र परिवारचा उपक्रम

येथील आय एम ए सभागृहात मागील २८ दिवसा पासून स्वेच्छा रक्तदान उपक्रम सिकलसेल व थायलेसेमिया च्या रुग्णांना रक्त पुरवठा व्हावा म्हणून सुरू आहे.आम.सुधीरऊ मुनगंटीवार मित्र परिवार चा हा उपक्रम असून आज गुरुवार( ३० एप्रिल)ला ९ शिक्षकांनी स्वयंस्फूर्त रक्तदान केले.

या वेळी अध्यक्षस्थानी ,लोकमान्य टिळक स्मारक मंडळचे अध्यक्ष दत्तप्रसंन्न महादानी यांची तर प्रमुख अतिथी म्हणून लो.टि.स्मारक मंडळचे उपाध्यक्ष ऍड अजय पचपोर,डॉ झेबा निसार, डॉ मंगेश गुलवाडे, प्रकाश धारणे,सुभाष कासंगोट्टूवार, मुक्ती फाउंडेशनच्या मंजुश्री कासंगोट्टूवार यांची उपस्थिती होती.

आमदार सुधीरभाऊ मित्र परिवार तर्फे रामनवमीच्या शुभंपर्वावर हा उपक्रम सुरू करण्यात आला.अनेक समाजाने व सामाजिक संघटनांनी पुढाकार घेत रक्तदान केले. आज२९ व्या दिवशी येथील लोकमान्य टिळक कन्या विद्यालयाचे प्रशांत आरवे ,दिनेश देव,वसंत वडस्कर,अविनाश कोटनाके,गजानन गोनाडे,स्वप्नील गावंडे,प्रदीप कळसकर यांचे सह प्रा.डॉ सचिन वझलवार यां ९ शिक्षाकांचा समावेश होता .तर मुक्ती फाउंडेशनच्या दीक्षा सूर्यवंशी,मंथना नन्नावट, बेबी राऊत

३ महिलांनी ही रक्तदान केले. विशेष म्हणजे झी न्युज चे पत्रकार आशिष अंबाडे यांनी रक्तदान करून स्वतःचा वाढ दिवस साजरा केला.फेसबुक च्या माध्यमातून माहिती मिळाल्यावर भद्रावती येथील स्वतंत्रकुमार शुक्ला यांनी येथे येऊन रक्तदान केले.
या प्रसंगी अध्यक्षीय मार्गदर्शनात दत्तप्रसंन्न महादानी यांनी रक्तदानांचे महत्त्व विशद करीत,

Advertisements

कोरोना संकटात आम.मुनगंटीवार यांच्या उल्लेखनीय कार्याचा संदर्भ देत कोरोना योद्धांचे कौतुक केले.तर प्रास्ताविकात डॉ गुलवाडे यांनी रक्तदान उपक्रमाची भूमिका विशद केली.यावेळी ऍड अभय पाचपोर यांनी समयोचित मार्गदर्शन केले.संचालन प्रशांत विघ्नेश्वर यांनी केले.प्रकाश धारणे यांनी आभार मानले.कार्यक्रमाला सूरज पेदुलवार,प्रज्वलन्त कडू,रामकुमार आकापेलिवार,मयूर चहारे यांची उपस्थिती होती.चंद्रपुर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या चमुने रक्तसंकलनाची महत्वपूर्ण भूमिका बजावली.

Advertisements
error: Content is protected !!