April 15, 2021

Maharashtra Metro

online news portal

बल्लारपूर येथील हत्याकांडाची सीबीआय चौकशी करण्यात यावी :- राजु झोडे

द्विवेदी कुटुंबातील दोघांचा मृत्यू तर एकजण गंभीर , राजु झोडे यांनी निष्पक्ष चौकशी करण्याची केली मागणी

बल्लारपूर येथे द्विवेदी यांच्या कुटुंबातील वडीलानेच आपल्या पोटच्या दोन तरुण मुलावर गोळ्या झाडल्या त्यात एका मुलाचा मृत्यू झाला असून एक मुलगा नागपूर येथे मृत्यूशी झुंज देत आहे. वडिलांनीच आपल्या दोन मुलांना गोळ्या झाडून स्वतः आत्महत्या केली असे निदर्शनात आले असले तरी सदर हत्याकांडाची सीबीआय चौकशी करावी अशी मागणी उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे यांनी पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली.

सविस्तर माहितीनुसार असे आढळून आले की, दि्ववेदी कुटुंबाकडे आत्मरक्षणाच्या नावाखाली एकंदरीत बंदुकीचे सहा परवाने होते. याच शस्त्र परवान्याच्या नावाने सिक्युरिटीचे काम घेतल्या जात होते. या शस्त्राचा गैरवापर त्यांनी आपल्याच कुटुंबात केला व त्यामुळे दोघांचा जीव गेला तर एक गंभीर आहे. कोरोना मुळे मागील एक महिन्यापासून संपूर्ण देशात लाकडावून केलेले आहे. अशातच कुटुंबातील सर्व सदस्य घरामध्ये राहत आहेत. काही तापट व रागीट स्वभावांच्या लोकांमुळे घरांमध्ये वादविवाद होत असून त्याचे रूपांतर भांडणांमध्ये होत आहे. अशातच जिल्ह्यातील बहुतांश लोकांकडे शस्त्राचे परवाने असून शस्त्र त्यांच्याजवळ आहेत. यामुळे मोठे घातपात पुन्हा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ज्याप्रमाणे बल्लारपूर मध्ये गोळीकांड घडून आले असे प्रकार पुन्हा होऊ शकतात. करिता ज्यांच्याकडे शस्त्राचे परवाने आहेत त्यांचे शस्त्र तात्काळ लाकडाउन संपेपर्यंत पोलिस विभागाने जमा करावे अशीही मागणी राजू झोडे यांनी केली. बल्लारपूर येथील द्विवेदी कुटुंबातील हत्याकांड हे अतिशय दुर्दैवी आहे. यामध्ये घातपात होण्याची शक्यताही नाकारता येत नाही करिता याची तात्काळ निष्पक्ष चौकशी करून सदर कुटुंबाला न्याय देण्यात यावा व लवकरात लवकर सीबीआय चौकशी करण्यात यावी अशी मागणी उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे यांनी पोलिस अधीक्षक चंद्रपूर यांच्याकडे केली आहे.

Advertisements
error: Content is protected !!